PMPML Bus: पुणे - पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी, पीएमपीएमएलने 5 रुपयांत 5 किलोमीटर प्रवास योजनेबाबत घेतला मोठा निर्णय

पुणे
सुनिल देसले
Updated Feb 22, 2023 | 13:41 IST

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणेकरांना सेवा देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएमएलने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: pmpml.org) 
थोडं पण कामाचं
  • पीएमपीएमएलने 2020 मध्ये पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकिट ही सेवा सुरू केली होती
  • सुरुवातीला एकूण 56 मार्गांवर ही सेवा चालवली जात होती

PMPML close 28 routes due to losses: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणेकरांना सेवा देणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited) PMPML ने बस सेवेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलने पाच किलमोमीटर अंतरासाठी 5 रुपये तिकिट ही सेवा सुरू केली होती. मात्र, आता काही मार्गांवर ही सेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. जाणून घ्या काय आहे त्यामागचं कारण...

हे पण वाचा : Exam Tips:परीक्षेच्या वेळी करू नका या चुका

पीएमपीएमएलने 2020 मध्ये पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकिट ही सेवा सुरू केली होती. एकूण 56 मार्गांवर ही सेवा चालवली जात होती. मात्र, या ठिकाणी नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून आलं. प्रवाशांची संख्या कमी असल्याने त्याचा थेट फटका हा पीएमपीएमएलच्या तिजोरीवर होऊ लागला होता.

हे पण वाचा : दररोज एक संत्री खायला हवी का?

या 56 मार्गांवर पीएमपीएमएलचा जेवढा खर्च होत होता तो सुद्धा उत्पन्नातून भरुन निघत नव्हता. हा तोटा लक्षात घेता पीएमपीएमएलने 28 मार्गांवरच ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तरीही पीएमपीएमएलला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत होता.

हे पण वाचा : Arogya Vibhag Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई मनपा अंतर्गत रिक्त पदांवर भरती, जाणून घ्या पद आणि पगार किती मिळेल

अखेर पीएमपीएमएलने 5 किलोमीटर अंतरासाठी 5 रुपये तिकिट आकारणी करण्याऐवजी नेहमी प्रमाणे तिकीट आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या 28 मार्गांवर 5 किलोमीटर अंतरासाठी 5 रुपये तिकिट आकारणी करण्याऐवजी नेहमीच्या दराने तिकिट घेतले जाणार आहे. या मार्गांवर नवे दर आकारण्यास 19 फेब्रुवारी 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी