Pune News: राज्यातील भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune police arrest fraudster who cheated with BJP female MLA's: भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

pune police arrest a man who duped four women bjp mla via online fraud
Pune News: राज्यातील भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 
थोडं पण कामाचं
  • पुणे पोलिसांची कारवाई
  • भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याला केली अटक 
  • आई आजारी असल्याचं सांगत महिला आमदारांची आरोपीने केली होती आर्थिक फसवणूक

Pune Crime News : महाराष्ट्रातील भाजपच्या (Maharashtra BJP) चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक (BJP women MLA duped) झाली होती. चक्क आमदारांचीच आर्थिक फसवणूक (financial fraud) झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. तसेच आमदारांचीच जर ऑनलाईन माध्यमातून फसवणूक होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्नही उपस्थित केला गेला. आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलीसही कामाला लागले आणि अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Pune police arrest a man who duped four women bjp mla via online fraud)

भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही घटना पुण्यात घडली होती. हाय प्रोफाइल केस असल्याने पुणे पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत अवघ्या काही दिवसांतच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अधिक वाचा : शिंदेचा दानवेंवर पलटवार, 'तो काय त्यांचा बॉस आहे...'

या प्रकरणी पुण्यात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो बिबवेवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला औरंगबाद येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मुकेश राठोड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सुनीता क्षीरसागर यांना पुणे पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतलं आहे. सुनीता आणि मुकेश हे दोघेही शेतकरी कुटुंबातील असून खर्चासाठी पैसे लागत असल्याने या दोघांनी मिळून चार आमदारांना खोटं सांगून पैसे घेतले.

अधिक वाचा : रामनाथ कोविंद बनणार सोनिया गांधींचे शेजारी

माझी आई बाणेर येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे मला काही पैसांची गरज आहे. तुम्ही मला 3400 रुपये ऑनलाईन पाठवा अशी बतावणी करून भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून पैसे मागून घेतले. मात्र हीच घटना आपल्या सहकारी महिला आमदार श्वेता महाले, मेघना बोर्डीकर आणि देवयानी फरांदे यांचा सोबत देखील घडल्याचे समोर आल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दाखल केली  होती. या दोघांनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

मात्र या प्रकरणात आपली फसवणूक झाली नसल्याचा दावा आमदार श्वेता महाले यांनी केला होता. आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या वृत्तावर आमदार श्वेता महाले यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं होतं, मलाही मदतीसाठी फोन आला होता. पण मी कसलीही मदत केली नाही. संबंधित तरुणाची संपूर्ण शहानिशा करून हा खोट बोलत आहे याची माहिती घेतली होती, माझ्या मतदारसंघातला असल्याचे त्याने खोटं सांगितलं होतं. त्यामुळे याबाबत माझी कसलीही आर्थिक फसवणूक झाली नाही असं आमदार श्वेता महाले यांनी म्हटलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी