TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा, उपसचिवाला पोलीस कोठडी

पुणे
रोहन जुवेकर
Updated Jan 30, 2022 | 00:37 IST

Pune Police arrest Sushil Khodvekar in TET Scam : टीईटी (Teacher Eligibility Test - TET) परीक्षा घोटाळा अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली.

Pune Police arrest Sushil Khodvekar in TET Scam
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा, उपसचिवाला पोलीस कोठडी 
थोडं पण कामाचं
  • शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा, उपसचिवाला पोलीस कोठडी
  • उपसचिवाला ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
  • कोर्टाने दिली पोलीस कोठडी

Pune Police arrest Sushil Khodvekar in TET Scam : पुणे : टीईटी (Teacher Eligibility Test - TET) परीक्षा घोटाळा अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली. खोडवेकर हे मुंबईत मंत्रालयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागात कार्यरत आहेत. कोर्टाने सुशील खोडवेकर यांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याआधी याच घोटाळ्यात पोलिसांनी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर, प्रितीश देशमुख या तिघांना अटक केली आहे. 

आरोपींनी २०१९-२०च्या टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८८० जणांना पैसे घेऊन गुण वाढवून पात्र केले; असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

तपासाचा भाग म्हणून सायबर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचा मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर झालेला निकाल यांची पडताळणी केली. परीक्षेत १६ हजार ७०५ जण पात्र झाले होते. पण तपासाअंती ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आल्याचे उघड झाले. 

पोलिसांनी ठोस माहिती हाती येताच ठाण्यातून उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली. ते मुंबईत मंत्रालयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागात कार्यरत आहेत. अटक केल्यानंतर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना शिवाजीनगर येथील कोर्टात सादर केले. कोर्टाने खोडवेकर यांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडीत खोडवेकर यांची सखोल चौकशी होणार आहे. आयएएस अधिकारी असलेल्या खोडवेकर यांच्यावर टीइटी परीक्षा घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी