बापरे ! पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल तब्बल ११०५ काडतुसे जप्त

pune police have seized 1105 cartridges from scrap shop : पुणे पोलिसांनी गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली. यादरम्यान, त्यांना तब्बल जिवंत काडतुसे तसेच काडतुसाचे लीड सापडले आहेत. १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू दौऱ्यावर येत असल्याने पुणे पोलिसांनी पुणे शहरात ऑल आऊट ऑपरेशन मोहीम  राबविला होती. या ऑपरेशन दरम्यान या धाडीत पुणे पोलिसांना हे मोठ यश आलं आहे.

pune police have seized 1105 cartridges from scrap shop
पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू दौऱ्यावर येत आहेत
  • नरेंद्र मोदी यांचा देहू दौरा असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी केली मोठी कारवाई

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  हे १४ जून रोजी देहू दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांचा देहू दौरा असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. एका भंगाराच्या दुकानातून (Scrap shop) तब्बल ११०५ काडतुसे (Cartridges) पोलिसांनी एका जप्त केली आहेत. पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी (Pune Police) केली आहे.

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे-आठवले

पोलिसांनी गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली

पुणे पोलिसांनी गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकली. यादरम्यान, त्यांना  जिवंत काडतुसे तसेच काडतुसाचे लीड सापडले आहेत. १४ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू दौऱ्यावर येत असल्याने पुणे पोलिसांनी पुणे शहरात ऑल आऊट ऑपरेशन मोहीम  राबविला होती. या ऑपरेशन दरम्यान या धाडीत पुणे पोलिसांना हे मोठ यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी भंगार व्यवसायिक दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज या आरोपीला ताब्यात घेतलं असून, पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. काडतुसे कशासाठी आणली ? एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणली कुठून?  याची चौकशी पोलीस करत आहेत.

अधिक वाचा : खिशात पैसा राहत नाही? घराच्या मुख्य दरवाजासंबधी करा हे उपाय

भंगाराच्या दुकानात पोलिसांना नेमकं काय सापडले?

७९ खराब काडतुसे आणि ९७० बुलेट लीड त्याचबरोबर ५६ जिवंत काडतुसे, अशी एकूण ११०५ काडतुसे दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज यांच्या दुकानातून गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे. 

अधिक वाचा : IPO असावा तर असा...102 रुपयांवरून 7200 रुपयांवर पोचला शेअर 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी