Shivsainik attack on Uday Samant Car: राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला होता आणि त्याच दरम्यान सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला आहे. हा दगड भिरकावण्यात आल्याने उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. तसेच गाडीतील एका व्यक्तीला दुखापत झाली असल्याचं वृत्त समोर येत आहे. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होती त्याच परिसरातून उदय सामंत हे जात होते आणि त्यावेळी ही घटना घडली आहे.
उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला आणि त्याच दरम्यान त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. pic.twitter.com/80DkH7T3v8 — Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 2, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : Eknath Shinde अडचणीत; औरंगाबादमध्ये तक्रार दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
या घटनेनंतर शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत हे पुण्यातील कार्यक्रमात उपस्थित होते. त्या कार्यक्रमातून निघाल्यानंतर उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हे अति होत आहे. यांना चिथावण्यात आलं आहे. एक लक्षात ठेवा राज्यातील जनता अशा गोष्टींसाठी तुम्हाला साथ देणार नाही. आम्ही संयमाने आणि तुम्हीही संयमाने आपलं राजकारण करावं. आमच्यावर अशाच प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम भोगावे लागतील. विचारांची लढाई विचारांनी लढावी.
अधिक वाचा : Ajit Pawar: 'म्हणून मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झाला नाही', अजित पवारांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका
अनेकजण व्हायातपणे बोलत आहेत तरी सुद्धा आम्ही संयम ठेवला आहे. झालेला प्रकार निंदनीय आहे. कोणीही असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असो... कुणीही राज्यात अतिरेक करु नये. तुमच्या राजकारणासाठी सर्वसामान्यांना त्रास होईल असे वागू नका असेही संजय शिरसाट म्हणाले.
तुम्ही व्हिडिओ पाहिला तर उदय सामंत यांच्या गाडीसमोर नाचत आहेत. हे नाचणारे शिवसैनिक नाहीयेत शिवसेनाप्रमुखांनी लढणारा शिवसैनिक तयार केला आहे. हे मॅनेज केलेलं कारस्थान आहे. आपलं महत्त्व वाढवण्यासाठी काहींनी केलेलं काम आहे. यात राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते आहेत. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे केलं आहे असंही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.