[VIDEO]: धक्कादायक! मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल

पुणे
Updated Oct 15, 2019 | 13:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Trees cut in Pune for PM Modi event: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा होत आहे. मोदींच्या या सभेपूर्वी झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

pune sp college trees cut pm narendra modi rally vidhansabha election 2019
[VIDEO]: धक्कादायक! मोदींच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल 

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची पुण्यात सभा 
  • मोदींच्या सभेसाठी झाडांची कत्तल
  • पुण्यातील एसपी कॉलेज परिसरात झाडांवर कुऱ्हाड 

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभरात आपल्या मोठमोठ्या प्रचारसभांचे आयोजन केलं आहे. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्या महाराष्ट्रात प्रचारसभा होत आहेत. त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करुन स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा संदेश संपूर्ण भारतवासियांना दिला होता. याला चार दिवस होत नाहीत तोवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा होत आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे.

मोदींच्या पुण्यातील सभेसाठी एसपी कॉलेजच्या परिसरात मोठं व्यासपीठ तयार करण्यात येत आहे. पण याच परिसरात असलेल्या झाडांची कत्तल सोमवारी रात्री करण्यात आल्याचं उघड झालं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही झाडे तोडली असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात आणि साताऱ्यात जाहीर सभा होणार आहे. साताऱ्यात दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करतील आणि त्यानंतर पुण्यातील एसपी कॉलेजच्या परिसरात सभेला संबोधित करणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी