Pune Traffic Diversion: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग

पुणे
सुनिल देसले
Updated Apr 13, 2023 | 12:18 IST

Pune traffic diversion updates: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे स्टेशन, अरोरा टॉवर कॅम्प, विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

pune traffic diversion on 14 april 2023 Dr Babasaheb Ambedkar Jayanti read traffic changes new routes in marathi
प्रातिनिधिक फोटो (Photo: PuneCityTraffic twitter)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Traffic diversion in Pune for Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने समाजातील सर्व स्तरातील नागरिक पुणे शहर व बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या वाहनातून पुण्यात येत असतात. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथील पुतळा, अरोरा टॉवर चौकातील पुतळा आणि विश्रांतवाडी चौक ते कळस फाटा व कळसफाटा ते विश्रांतवाडी चौक परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात.

सदर मिरवणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे दोन्ही बाजूस गर्दी होत असते त्यामुळे सदर ठिकाणांवर वाहन चालकांची गैरसोय होऊ नये व वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने करिता पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन सदर परिसरातील वाहतूकीत नमुद केलेल्या वेळेनुसार व आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात पुढीलप्रमाणे बदल करण्यात येणार आहे.

हे पण वाचा : ...म्हणून विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकतात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

शाहिर अमर शेख चौक

  1. शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहिर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे.
  2. पर्यायी मार्ग - शाहिर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक - जहांगीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

जीपीओ चौक 

  1. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे. 
  2. पर्यायी मार्ग - जीपीओ चौकातून बोल्हाई / मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक - नेहरू मेमोरियल चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.

हे पण वाचा : गर्लफ्रेंडसमोर चुकूनही बोलू नका या 9 गोष्टी

पुणे स्टेशन चौक

  1. पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे.
  2. पर्यायी मार्ग - पुणे स्टेशन अलंकार चौक मार्गे इच्छितस्थळी

नरपतगिरी चौक

  1. नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळविण्यात येत आहे.
  2. पर्यायी मार्ग - नरपतगिरी चौक 15 ऑगस्ट चौक कमला नेहरु हॉस्पीटल, पवळे चौक, कुंभारवेस चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

हे पण वाचा : ...म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड मिळत नाही

बॅनर्जी चौक

  1. बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येत आहे.
  2. पर्यायी मार्ग - बॅनर्जी चौकाकडून पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरु हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभारवेस चौकातून इच्छितस्थळी जातील.

वरील नमूद वाहतूक व्यवस्थेतील बदल हे दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत तात्पुरते अंमलात राहतील.

हे पण वाचा : हे गुण असलेली मुलगी मिळाली तर लग्नाला चुकूनही देऊ नका नकार

पार्किंग व्यवस्थेबाबत

मालधक्का चौक ते बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन, बोल्हाई चौक ते साधु वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जी.पी.ओ., बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक, फोटोझिंको प्रेस उपरस्ता व बोल्हाई चौक ते डॉ. बॅनर्जी चौक या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेखेरीज सर्व प्रकारची वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयास अभिवादन करावयास येणा-या भाविकांच्या वाहनांकरीता आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने) व ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून भावीकांनी आपली वाहने सदर पार्किंगचे ठिकाणीच पार्क करुन प्रशासनास सहकार्य करावे.

हे पण वाचा : अरेंज मॅरेज करण्यापूर्वी हे 7 प्रश्न नक्की विचारा

अरोरा टॉवर परिसर

डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक 

  1. डॉ. कोयाजी रोड वरुन (सिल्व्हर जुबली मोटर्स) नेहरु चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळविण्यात येत आहे. 
  2. पर्यायी मार्ग :- डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक - एस. बी. आय. हाऊस चौक मार्गे इच्छितस्थळी

इस्कॉन मंदिर चौक

  1. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक इस्कॉन मंदिर चौकातून वळविण्यात येत आहे. 
  2. पर्यायी मार्ग - डॉ. कोयाजी रोड तीन तोफा चौक - एस.बी.आय. हाऊस चौक मार्गे इच्छितस्थळी

हे पण वाचा : लग्न करण्याचे तोटे, वाचल्यावर म्हणाल काय खरे अन् काय खोटे

नेहरु चौक

  1. नेहरु चौकाकडुन तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतुक नेहरु चौकातून वळविण्यात येत आहे. 
  2. पर्यायी मार्ग - नेहरु चौकातून किराड चौक ब्ल्यू नाईल चौक एस.बी. आय. हाऊस मार्गे इच्छितस्थळी

नाझ चौक 

  1. महात्मा गांधी रोडवरुन नाझ चौकातून अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक नाझ चौकातून वळविण्यात येत आहे.
  2. पर्यायी मार्ग - नाझ चौक डावीकडे वळून बाटलीवाला बगीचा मार्गे इच्छितस्थळी

हे पण वाचा : रात्री इनरवेअर घालून झोपावे की नाही?

पार्किंग व्यवस्था

दोराबजी चौक ते अरोरा टॉवर ते तीन तोफा चौक व अरोरा टॉवर ते नाझ चौक, तारापोर रोड जंक्शन या रस्त्यांवर सर्व प्रकारचे वाहनांकरीता नो पार्किंग करण्यात येत आहे.

अरोरा टॉवर चौकातील डॉ. आंबेडकर यांचे पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणा-या भाविकांनी आपली वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे अँण्ड पार्कच्या ठिकाणी पार्क करावीत.

वरील नमूद अरोरा टॉवर परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल हे दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6 वा. पासुन गर्दी संपेपर्यंत तात्पुरते अंमलात राहतील. मिरवणूक मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार / टप्या-टप्याने बंद अथवा इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी