पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर,उर्वरित वेळापत्रक टप्याटप्याने प्रसिद्ध होणार

पुणे
अजहर शेख
Updated Mar 26, 2021 | 11:58 IST

Pune University exam schedule announced : पुणे विद्यापीठाच्या निवडक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. उर्वरित वेळापत्रक टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार.

Pune University exam schedule announced
पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा
  • उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक हे टप्याटप्याने प्रसिद्ध करण्यात येईल
  • विधी विभागाची पदवी आणि पदविका परीक्षा या १० एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान होणार

पुणे : राज्यात कोरोनाचे (corona virus) रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यापीठातील परीक्षा या ऑनलाइन (online exam) पद्धतीने होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली होती. दरम्यान, पुणे विद्यापीठाकडून (pune university) काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्याही ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे

शारीरिक शिक्षण, पदवी आणि पदवीत्तर अभ्यासक्रम, विधी पदविका आणि पदवी आभ्यासक्रम त्याचबरोबर शारीरिक शिक्षणातील एम ए , जर्नालीज्म आणि मास्क कम्युनिकेशन या अभ्यासक्रमातील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक हे टप्याटप्याने प्रसिद्ध करण्यात येईल असं परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कधी होणार परीक्षा?

पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या शारीरिक शिक्षण विभागाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या ११ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर विधी विभागाच्या पदवी आणि पदविका परीक्षा या १० एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान होणार आहेत. जर्नालीझम आणि मास्क कम्युनिकेशनच्या परीक्षा १० एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक हे टप्याटप्याने जाहीर करण्यात येईल असं परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सोलापूर विद्यापीठच्या परीक्षांविषयी माहिती

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या  (solapur university) पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती दिली आहे.

२६ एप्रिल २०२१ पासून पारंपारिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील

इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमाच्या सत्र एक ते चारच्या परीक्षा ५ मे २०२१ पासून सुरू होतील, अशी संभाव्य तारीख दिली गेली आहे. तर, पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून २६ एप्रिल २०२१ पासून पारंपारिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील, अशी संभाव्य तारीख आहे. 

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका ही ५० गुणांची असेल

अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, असे परीक्षा संचालक सीए शाह यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका ही ५० गुणांची असणार आहे. त्यानुसार विद्यापीठ परीक्षा विभागाकडून रचना करण्यात येत असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी