Pune University Exam : पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार ऑनलाइनच; अर्ज भरण्याची ही आहे अंतीम तारीख 

Pune University Exam form last date । गेल्या काही दिवसांपासून  वाढत चाललेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संभाव्य संकट पाहता विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून निर्णय आल्यानंतर परीक्षांची तयारी केली जाणार आहे. सध्या विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

pune university exams will be on online mode registration process till 15 January 2022
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार ऑनलाइनच 
थोडं पण कामाचं
  • पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच
  • अर्जांसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत
  • अद्याप ७० टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त

Pune University Exam updates । पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. परीक्षा ऑनलाइन होणार असली, तरी अद्याप ३० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले नसल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून अर्ज भरण्यासाठी १५ जानेवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले. 

SSC And HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'आनंदाची बातमी';  शिक्षण मंडळाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

गेल्या काही दिवसांपासून  वाढत चाललेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संभाव्य संकट पाहता विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून निर्णय आल्यानंतर परीक्षांची तयारी केली जाणार आहे. सध्या विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ७० टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, अजूनही ३० टक्के विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नसल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाइन असल्या, तरी त्या कशापद्धतीने होतील, याबाबतची माहितीही या वेळी देण्यात येणार आहे.

CBSE दहावी, बारावी टर्म १ च्या परीक्षांच्या निकालासंदर्भात ही महत्वाची बातमी

अनेक महाविद्यालयांमध्ये सध्या परीक्षांचे अर्ज करण्यासाठी रांगा दिसत आहेत. काही महाविद्यालये विद्यार्थ्यांना शुल्क भरले नाही म्हणून परीक्षांचे अर्ज भरू देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालयांनी शुल्कासाठी विद्यार्थ्यांची परीक्षांपासून अडवणूक करू नये; अन्यथा अशा महाविद्यालयांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून परीक्षेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे परीक्षा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी येत्या १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरून पूर्ण करावेत. ज्यामुळे परीक्षा वेळेत आणि सुरळीत पार पडण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक  डॉ.महेश काकडे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी