पुण्यात आठवड्यातल्या शेवटच्या दिवसांत लॉकडाऊन, जाणून घ्या काय असणार सुरू, काय राहणार बंद

Pune weekend lockdown: पुणे महापालिकेने सोमवारी दिलेल्या आदेशांनुसार पुणे आणि परिसरातील सर्व औद्योगिक आस्थापना आणि अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

Pune weekend lockdown
पुण्यात आठवड्यातल्या शेवटच्या दिवसांत लॉकडाऊन, जाणून घ्या काय असणार सुरू, काय राहणार बंद 

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनदरम्यान पुण्यात काय काय राहणार बंद?
  • पुण्यात लॉकडाऊनदरम्यान काय राहणार खुले?
  • कोरोना विषाणूचे पुण्यातील थैमान सुरूच

Pune weekend lockdown:​ पुणे: कोरोना विषाणूच्या (Corona virus) संसर्गबाधितांच्या (infected people) संख्येत मोठी वाढ (big surge) झाली आहे. देशभरात सर्वाधिक बाधितसंख्या असणाऱ्या स्थानांमध्ये पुण्याचा (Pune) मोठा वाटा आहे. शहरात कोव्हिड-19च्या (covid-19) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने राज्य सरकारने (state government) आठवड्यातील शेवटच्या दिवशी (weekend) शहरात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (lockdown) आणि रात्री संचारबंदी (night curfew) आणि दिवसा जमावबंदीचे आदेश (orders) जारी केले आहेत. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) सोमवारी दिलेल्या आदेशांनुसार पुणे आणि परिसरातील सर्व औद्योगिक आस्थापना (industrial establishments) आणि अत्यावश्यक सेवांची दुकाने (essential services shops) वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. (Pune weekend lockdown, full list of what’s open and what is closed)

लॉकडाऊनदरम्यान पुण्यात काय काय राहणार बंद?

1. अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडता इतर सर्व आस्थापना आणि दुकाने

2. सर्व खासगी कार्यालये

3. हॉटेल

4. उपहारगृहे

5. बार

6. चित्रपटगृहे

7. केशकर्तनालये

पुण्यात लॉकडाऊनदरम्यान काय राहणार खुले?

1. अत्यावश्यक सेवांची दुकाने आणि आस्थापना

2. वास्तव्यासाठीच्या हॉलेटमध्ये रूम सर्व्हिस

पुण्यात रात्रीची संचारबंदी लागू

पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता नुकत्याच पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीच्या वेळा बदलल्या आहेत.

रात्रीच्या संचारबंदीची जुनी वेळ: संध्याकाळी 6 ते पहाटे 6

रात्रीच्या संचारबंदीची नवी वेळ: संध्याकाळी 6 ते पहाटे 7

कोरोना विषाणूचे पुण्यातील थैमान सुरूच

पुण्यात काल एका दिवसात 10,907 नव्या बाधितांची, 62 मृत्यूंची नोंद झाली तर 7,832 रुग्णांना घरी सोडण्यात आले. या परिस्थितीवर भाष्य करताना पुण्याच्या महापौरांनी म्हटले आहे, "जर नवबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर व्हेंटिलेटर्स असलेल्या खाटांची कमतरता जाणवू शकते. मी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून इतर राज्यांमध्ये जिथे कोव्हिड-19ची परिस्थिती नियंत्रणात आहे तिथून व्हेंटिलेटर्स असलेल्या खाटा इथे पोहोचवण्याची विनंती केली आहे." (Pune weekend lockdown, full list of what’s open and what is closed)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी