Pune murder cctv: पुण्यात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास तरुणांच्या टोळक्याने एका तरुणावर तब्बल ३५ वार करुन संपवलं आहे. इतकेच नाही तर आरोपींनी या तरुणावर वार केल्यानंतर त्याच्या डोक्यात पेवर ब्लॉक टाकण्यात आला. पुण्यातील नाना पेठ परिसरात हे हत्याकांड घडलं आहे. ही थरारक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (pune youth stabbed 32 times on road shocking incident caught in cctv)
मृतक तरुणाचे नाव अक्षय वल्लाळ असे असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.
#FirstOnTNNavbharat: पुणे में अक्षय नाम के युवक की बेरहमी से हत्या, CCTV में कैद हुई मर्डर की वारदात — Times Now Navbharat (@TNNavbharat) July 28, 2022
ज्यादा जानकारी दे रहे हैं संवाददाता @Aruneel_S@iamdeepikayadav @spbhattacharya #Pune #PuneMurder pic.twitter.com/LSsOatm89u
अधिक वाचा : Mumbai Crime: मुंबई हादरली ! १३ वर्षीय मुलावर ६ अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, आरोपी आपल्या खिशातून चाकू बाहेर काढतो आणि त्यानंतर अक्षयवर सपासप वार करण्यास सुरुवात करतो. तर दुसरा आरोपी अक्षयला मारहाण करताना दिसून येत आहे.
अधिक वाचा : Viral Video : नागपूर पोलीस हवालदाराने हॉटेलच्या गार्डला मारली कानाखाली, नो पार्किंगवरून वाद, व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अक्षय वल्लाळ याचे आपल्या परिसरात असलेले कार्य पाहून आरोपी महेश बुरा आणि किशोर शिंदे यांचा अक्षयवर राग होता. याच रागातून काही दिवसांपूर्वी आरोपींचा अक्षय सोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी अक्षयला गाठत त्याच्यावर धारदार चाकूने वार केले.
चाकूने वार केल्यानंतर आरोपी तिथेच थांबले नाही तर त्यानंतर अक्षयच्या डोक्यात पेवर ब्लॉकडी टाकला. या हल्ल्यात अक्षय याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी महेश बुरा आणि किशोर शिंदे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे नवा वाडा नाना पेठ येथील निवासी आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.