Pune: सेक्सटॉर्शनमुळे पुण्यातील तरुणाची आत्महत्या, प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले थेट राजस्थानपर्यंत

पुणे
सुनिल देसले
Updated Nov 22, 2022 | 17:39 IST

Pune News: पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीला राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून अटक केली आहे. या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून 19 वर्षीय मुलाला ब्लॅकमेल केलं आणि त्यानंतर या मुलाने आत्महत्या केली. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणारा गजाआड
  • सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून 19 वर्षीय तरुणाला केलं ब्लॅकमेल
  • ब्लॅकमेल केलेल्या तरुणाने संपवलं आपलं जीवन

Pune youth commit suicide after sextortion call: गेल्या काही दिवसांत सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. सेक्सटॉर्शन चालवणारे आरोपी आपल्या जाळ्यात तरुणांना अडकवतात आणि त्यांना ब्लॅकमेल करुन मोठी रक्कम वसूल करतात. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील एका 19 वर्षीय मुलाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करण्यात आलं. मात्र, या नंतर या तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे. (pune youth suicide after sextortion call police arrest one person from Rajasthan crime news marathi)

पोलिसांच्या मते, या सेक्सटॉर्शन रॅकेटचं जाळं राजस्थानशी संबंधित आहे. सेक्सटॉर्शन चालवणारा मास्टरमाईंड हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील गोथरी गुरू गावातून अटक केली आहे. आरोपीचं नाव अनवर खान असे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अनवर याला पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. सोमवारी पुणे सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

अशा प्रकारे करत होते ब्लॅकमेल

या सेक्सटॉर्शन रॅकेटमध्ये अडकलेल्या एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अनवर खान याने मृतक तरुणाला लैंगिक शोषणाचा आरोप करत ब्लॅकमेलिंग सुरू केलं होतं. आरोपीने मृतक तरुणाकडून वारंवार पैशांची मागणी सुरू केली होती. तसेच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी सुद्धा देत होता. त्याला कंटाळून या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.

हे पण वाचा : या 6 टिप्सने तुम्ही लैंगिक संबंध ठेवण्यास राहाल नेहमीच उत्सुक

पोलिसांनी सांगितले की, तांत्रिक मदतीच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपी हा राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या टीमने राजस्थान पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली. जेव्हा पुणे पोलिसांची टीम आरोपीच्या घरी पोहोचली तेव्हा स्थानिक गुंडांनी पोलिसांच्या टीमवर हल्ला केला. या हल्ल्याला पोलिसांनी प्रत्त्युत्तर दिलं. गुंडांनी केलेल्या हल्ल्यात पुणे पोलिसांच्या टीमचे दोन जण जखमी झाले. अखेर पुणे पोलिसांनी मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी