पुणे : पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात (Lal Mahal) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली, त्याच लाल महालात लावणीची शुटिंग झाली. याचा व्हिडिओही (Video) चांगलाच व्हायरल झाला असून यावर आता राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) ने मात्र तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, लाल महल शुद्ध (pure) करण्यात आलं आहे. जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे. पुण्यामध्ये मराठा महसंघातर्फे ज्या ठिकाणी शूट झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी इथल्या जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. त्यांनतर सभामंडपात गोमूत्र तसेच गुलाबपाणी शिंपडून हा परिसर शुद्ध केला आहे.
ऐतिहासिक लाल महलात डान्स करणाऱ्या वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या तीन साथीदारांनी लाल महालात डान्स करत शूटिंग करुन व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केले होते. वैष्णवीच्या डान्सनंतर समाज माध्यमातून टीका झाली. तर संभाजी ब्रिगेड सह पुरोगामी संघटनेने या घटनेविषयी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शौर्याची साक्ष देणारा लाल महाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लाल महालात तमाशातल्या गाण्यांवर मुलींना ( नाचवून बदनाम केला जात आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराचा विरोध केला आहे. तर पुणे पोलिसांना आवाहन केले आहे. या सर्व प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याचा विरोध केला आहे. तसेच नागरिकांना आव्हानही केले आहे. ते म्हणाले, "पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका"
मराठा महासंघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण करणार आहे. लाल महलात लावणी केल्याने शुद्धीकरण केले जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, लाल महालात नृत्याविष्कार करणाऱ्यांवर गुन्हा करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या तीन साथीदारांनी लाल महालात नृत्य करत शूटिंग करुन व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केले होते. वैष्णवीच्या नृत्यानंतर समाज माध्यमातून टीका झाली होती.
चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महालमध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.
दरम्यान, लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप केला जात आहे. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केलंय तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचं समोर आले आहे. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये ही लावणी करण्यात आली.