MNS News Latest Updates : मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावर आक्रमक झालेले राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे आता फॉर्मवर आली आहे. शस्त्रक्रियेपूर्वी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि भोंग्यामुळे राज्यासह देशात राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा आवाज वाढवला आहे. आता शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले असून 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक' ही घोषणा देत नवीन सदस्यांना आपल्या पक्षात घेणार आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरू होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागलाय. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला.
Read Also : Liger review अनेकांना आवडला VDचा 'Liger' अभिनय
आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्यानं मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे. या मुद्यावर मनसेला पुन्हा सूर गवसणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी पक्ष स्थापनेवेळी राज ठाकरे यांनी 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' हे घोषवाक्य दिलं होतं. आता मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक हे घोष वाक्य तयार केलं आहे.
राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील दोन महिने राज ठाकरे विश्रांती घेत होते.
शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबईत दोन दिवस पदाधिकारी बैठक आणि मेळव्यानंतर आज ते पुण्यात असणार आहेत. पुण्यातून आज मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी शुभारंभाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
Read Also : दहशतवाद्याने समोर आणला पाकिस्तानचा पापी चेहरा
आगामी निवडणुकांपूर्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेनं नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. 'मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक' असं मनसेचं नवं घोषवाक्य असणार आहे. मनसेच्या या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्त्वाचा मुद्दा जोडण्यात आला आहे.