PUNE MNS : साईनाथ बाबर पुणे मनसेचे नवे शहरप्रमुख, नाराजी व्यक्त केल्याने वसंत मोरे यांची हकालपट्टी

पुणे
रोहन जुवेकर
Updated Apr 07, 2022 | 17:48 IST

raj thackeray removed vasant more from pune mns city chief position now sainath babar will take charge : पुणे मनसेच्या शहरप्रमुख पदावर नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती झाली. वसंत मोरे यांना पुणे मनसेच्या शहरप्रमुख पदावरून हटविण्यात आले.

raj thackeray removed vasant more from pune mns city chief position now sainath babar will take charge
PUNE MNS : साईनाथ बाबर पुणे मनसेचे नवे शहरप्रमुख 
थोडं पण कामाचं
  • PUNE MNS : साईनाथ बाबर पुणे मनसेचे नवे शहरप्रमुख
  • वसंत मोरे यांना पुणे मनसेच्या शहरप्रमुख पदावरून हटविण्यात आले
  • वसंत मोरे यांची हकालपट्टी होणार हे निश्चित होते

raj thackeray removed vasant more from pune mns city chief position now sainath babar will take charge : पुणे : पुणे मनसेच्या शहरप्रमुख पदावर नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती झाली. वसंत मोरे यांना पुणे मनसेच्या शहरप्रमुख पदावरून हटविण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा बदल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे अधिकृत ट्विटर हँडलवर बदलाची माहिती देण्यात आली.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला होता. अनेक कोर्टांचे आदेश येऊनही मशिदींवरचे भोंगे हटविले जाणार नसतील तर मनसे सार्वजनिक ठिकाणी लाउडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण सुरू करेल; असे राज ठाकरे म्हणाले. यानंतर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये तसेच नाशिकमध्ये निवडक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाउडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. पोलिसांनी या सर्व ठिकाणी कारवाई केली. 

मनसेचा प्रभाव असलेल्या पुण्यातील कोणत्याही भागात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण सुरू झाले नव्हते. या संदर्भात आश्चर्य व्यक्त होत होते. पत्रकारांशी बोलताना पुणे मनसे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांचा आदेश पाळण्यास असमर्थता दर्शविली होती. पक्षाचे कार्यकर्ते पोलीस केस होऊ नये म्हणून आदेशाचे पालन करणे टाळत असल्याचे वसंत मोरे म्हणाले. यानंतर वसंत मोरे यांना हटवून पुणे मनसेच्या शहरप्रमुखपदी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली.

वसंत मोरे यांची हकालपट्टी होणार हे निश्चित होते. राज ठाकरे यांनी तातडीने पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलाविले होते. या बैठकीसाठी वसंत मोरे यांना निमंत्रित केले नव्हते. यामुळे वसंत मोरे यांची शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी होणार याचा अंदाज आला होता. अखेर हा अंदाज खरा ठरला. शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर वसंत मोरे मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण वसंत मोरे यांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही तसेच मनसे सोडलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी