Raj Thackeray: भाजपनं शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही, राज ठाकरे सेनेला टोला

पुणे
पूजा विचारे
Updated Oct 14, 2019 | 19:48 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा पार पडली. पहिली प्रचार सभा रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंची ही पुण्यात पहिली सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर चांगला निशाणा साधला. त्यासोबतच शिवसेनेला टोला लगावला आहे.

Raj thackeray
Raj Thackeray LIVE: कसबामध्ये राज ठाकरेंची सभा लाईव्ह  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा पार पडली
 • विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी कसबा पेठे येथे सभा घेतली.
 • पहिली सभा रद्द झाल्यानंतर पुण्यात राज यांची पहिली सभा झाली.

पुणेः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभर प्रचार सभा होत आहेत. त्यातच त्यांची आज पुण्यातील कसबा पेठ येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप शिवसेनेवर टीका केली आहे. पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते हि हतबलता, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.सरकारने घोषणा केली होती कि '१०० स्मार्टसिटी घडवणार'. काय झालं त्या योजनेचं? शहरात भरलेलं पाणी म्हणजे स्मार्ट सिटी का? कि वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. खरंतर निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे पुण्यात फोडणार होते. पण पाऊस पडल्यानं त्यांना आपली पुण्यातली पहिली प्रचारसभा रद्द करावी लागली होती.

 

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्देः

 1. बाळासाहेब असते तर असं झालं नसतं, मी पण असतो तरी झालं नसतं - राज ठाकरे
 2. दररोज हे भाजपवाले इज्जत घेताहेत. शिवसेनेला लाचार करून ठेवले आहे.
 3. पुण्यात शिवसेनेसारखं काही दिसत नाही- राज ठाकरे
 4. महाराष्ट्र वगळता सर्व राज्यांनी आपली प्रादेशिक आस्मिता जपली, बहुमत असताना राज्यात सुविधांचा अभाव का?
 5. पैसे फेकू, दारू वाटू हे आपल्याच मतदान करतील.
 6. महाराष्ट्रात १० स्मार्ट सिटी आणणार होते. पुण्यात पाणी भरलं ही स्मार्ट सिटी, गाड्या वाहून गेल्या ही तुमची स्मार्ट सिटी. नाशिकमध्ये मनसेच्या काळात झालेली कामे यांनी भाजपने स्मार्ट सिटीत दाखवली.
 7. विलासरावांचा पीए हा दाक्षिणात्य होता. बीएमडब्ल्यू ही कंपनी महाराष्ट्रात येणार होती. पण त्या अधिकाऱ्याने नकार घंटा लावली. आणि तामिळनाडूच्या सहकाऱ्याला फोन करून सांगितले. त्यानंतर बीएमडब्ल्यूचा कारखाना तमिळनाडूत गेला.
 8. माझ्यावर प्रांतीय असल्याचा आरोप केला जातो - राज ठाकरे 
 9. कोणी बहुमतात जरी आले, तरी त्यांना नडणारा विरोधीपक्ष हवा असतो- राज ठाकरे
 10. नोट बंदीचा निर्णय फसला, तर देश खड्ड्यात जाईल हे मी सांगितले होते. १ लाख १० हजार कोटीचे कर्ज काढून आपण बुलेट ट्रेन काढतो. कोणी विचारत नाही, कारण त्यांना वाटतं की आपण बहुमतात आहे.
 11. देशात भीषण परिस्थिती आहे, चॅनलवाले दाखवणार नाही, वृ्त्तपत्र दाखविणार नाही.
 12. मनमोहन सिंग यांचे सरकार गेले, सर्व सुरळीत चालू होतं. ऑटो पायलट मोडमध्ये ठेवलं असते तरी चालले असते, काय गरज होती हातात स्टेअरिंग घ्यायची.
 13. या देशातील कोणता माणूस आहे, ज्याला खात्री आहे त्याची नोकरी कायम राहणार आहे. येत्या काळात वाहन उद्योगातील १० लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
 14. सिंचनाच्या नावाने राष्ट्रवादीच्या नावाने बोंब झाली आणि सत्ता बदल झाली. पण आजही सिंचनाच्या नावाने बोंब आहे. मी का भाषण देतो, तुम्हा का येतात, का ऐकतात हा मला प्रश्न पडतोय.
 15. मतदान होतो, मग देश खाली जातो आहे. माझा महाराष्ट्र खाली खाली का जातोय...तुमच्या हातात सत्ता दिली तर विकास झाला नाही.
 16. यवतमाळ जिल्हा हा कशासाठी प्रसिद्ध तर देशात सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा... काय ती ओळख
 17. अमोल यादव या तरूणाने मुख्यमंत्र्यानी आश्वासन दिले, त्याने हेलपाटे मारले. आता तो अमेरिकेत गेला त्याला अमेरिकेच्या लोकांनी जमीनही दिली आणि तो प्रयोगही करणार आहे.
 18. निवडणुकीला येतात आणि थापा मारताहेत.मेक इन इंडियाच्या नावाखाली स्वप्न दाखवतात, पण नोकऱ्या काही नाही- राज ठाकरे
 19. गुजरातमध्ये पटेलांचा ३ हजार कोटींचा पुतळा झाला, पण आपल्या महाराजांचा पुतळा अजून झाला नाही.
 20. महाराजांचे गडकिल्ले सुधारा, त्यासाठी कितीही पैसे लागतील तरी चालेल
 21. आतापर्यंत तुमचा आवाज ऐकला, मग आमचा आवाज ऐकवू का? राज ठाकरेंनी दिली लंबी... महाराजांचा पुतळा हा निवडणुकीचे नाटक एवढ्यापूरती मर्यादीत राहिले आहे- राज ठाकरे
 22. राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाजवळ सुरू होता झिंगाट गाण्यावर डान्स, राज ठाकरे चिडले. पोलिसांना केली विनंती, तुम्ही सांगा किंवा नाही तर आम्ही सांगतो.
 23. मराठ्यांनी या भूमिवर सव्वाशे वर्ष राज्य केले, हा इतिहास आपण सांगत नाही. हा इतिहास जगविण्याचा, टिकविण्याचे काम सरकारांनी करायचे असते.
 24. पुण्यातील कसबा गणपती हा जिजाऊंनी प्रतिष्ठापना केली.आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला इतिहास सांगत नाही. महाराजांचा इतिहास हा आपल्या  पाठपुस्तकात नाही.
 25. पुण्यात पहिल्यांदा लोक आले आणि वसले ती पहिली पेठ ही कसबा पेठ, इतिहास वाचतो तेव्हा, अंगावर शहारा येतो
 26. मी त्यांची बरोबरी करणार नाही, पण मला खूप बरं वाटतं या ठिकाणी मी आलो- राज ठाकरे
 27. महात्मा ज्योतिबा फुले मंडई ही ऐतिहासिक जागा, मोठ मोठ्या दिग्गजांनी या ठिकाणी सभा घेतल्या.
 28. कोल्हापुरात पूर आला, सरकारमधला मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला. काही घरंगळत जातात, हे वाहत आलेत- राज ठाकरे
 29. हा पाहा आमचा अजय शिंदे.... चंपाची चंपी करणार, राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
 30. पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत- राज ठाकरे
 31. सात ते आठ गाड्या वाहून गेल्या, खराब झाल्या. चंपा... म्हटल्यावर राज ठाकरे हसले
 32. कशाला पोकळ शंक फुंकताहेत, राज ठाकरेंना झाला झेंड्याचा त्रास, कार्यकर्त्याला बसवले खाली
 33. कसबा पेठ येथे सुरू आहे, मनसेची पहिली प्रचार सभा
 34. कसबामधील मनसेचे उमेदवार अजय शिंदेसाठी प्रचारसभा
 35. कसबामध्ये राज ठाकरेंची सभा लाईव्ह
 36. राज ठाकरेंच्या सभेला सुरूवात
 37. आज राज ठाकरे कोणावर साधणार निशाणा?
 38. थोड्याच वेळात राज ठाकरे यांची सभा सुरू होणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी