Raj Thackeray : पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे मशीदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे हे येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे भव्य सभा घेणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी मात्र, ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला परवानगी दिली नसून, राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टांगती तलवार आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या अगोदर पोलिसांनी औरंगाबादमध्ये १३ दिवस जमावबंदीचे आदेश लागू केल्याने सभा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला असला तरी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा, असे आदेश मनसैनिकांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा होत असली तरी मनसे प्रमुख राज ठाकरे हे २९ तारखेला मुंबई सोडत असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक वाचा : गृहप्रवेशाच्या वेळी हे नियम महत्त्वाचे आहेत, वाचा सविस्तर
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राज ठकारे पुण्यात आपल्या कार्यकर्त्यांसोबत येणाऱ्या महानगपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा तसेच निवडणुकीची मोर्चेबांधणी देखील करणार असल्याची माहिती आहे. यानंतर ते ३० एप्रिलला सायंकाळी पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील.
अधिक वाचा : ऋषी धवनने गोलंदाजी करताना घातला अॅन्टिक मास्क
राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मराठवाडा सांस्कृतिक मैदानाऐवजी सिडको परिसरात असलेल्या गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. मनसेच्या या सभेला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडला तर लोकांना त्रास होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण मनसेने निश्चित केलेल्या सभेच्या ठिकाणी म्हणजेच मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा आहे.
अधिक वाचा : आलिया भट्ट रणबीर कपूरसाठी पोहोचली किचनमध्ये !!!
मनसेच्या या सभेला पोलिसांकडून अद्याप पर्यंत परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, मनसे आता आक्रमक होताना दिसत आहे. सभेला अवघे ८ दिवस उरले असताना देखील पोलिसांनी परवानगी न दिल्याने लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. दरम्यान, सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला अनेक संघटनांनी विरोध करत पोलिसांना निवेदन देत परवानगी नाकारावी असं म्हटलं आहे.