Raj Thackeray Rally Live updates: पुणे : अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द झाल्यनंतर आज मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यातून टीकेच्या तोफगोळेचा मारा विरोधकांवर करत आहेत. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) सभागृहात ही सभा होत आहे. राज ठाकरेंच्या अयोध्येचा दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) भाजप खासदार (BJP MP) बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केला होता. त्यावरही राज ठाकरे बोलणार आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना मुन्नाभाईची उपमा दिली होती. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही निशाण्यावर राहणार आहेत.
पुण्यात राज ठाकरे सभेला संबोधित करत आहेत. अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानंतर या दौऱ्याबाबत ते सभेत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. दरम्यान, सभेसाठी आलेल्या काही अंध विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावत त्यांना स्टेजवरच खुर्च्यांवर बसवले. त्यांच्या या कृतीचे मनसैनिकांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वागत केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या पुणे येथील जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण. Posted by MNS Adhikrut on Saturday, May 21, 2022
Raj Thackeray Rally LIVE UPDATES : सभेतील काही मुद्दे