पुण्यात पुन्हा घडली धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीवर गुंडांनी घरात घुसून वारंवार केला बलात्कार

साकीनाका परिसरात एका महिलेवर झालेल्या रेप प्रकरणामुळे महाराष्ट्रसह देश हादरून गेला आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातही बलात्काराच्या घटना घडत आहेत. ताज्या घटनेत पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला.

Rape of a minor girl in Pimpri Chinchwad
अल्पवयीन मुलीवर गुंडांनी घरात घुसून वारंवार केला बलात्कार   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अत्याचार करतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी
  • तिन्ही आरोपी हे बाल वयात असतानाच त्यांनी खुना सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले
  • पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिडीतेच्या आईला त्यांच्या सुरक्षितेविषयी मानसिक आधार दिला

पिंपरी : मुंबई येथील साकीनाका परिसरात एका महिलेवर झालेल्या रेप प्रकरणामुळे महाराष्ट्रसह देश हादरून गेला आहे. त्यातच पुण्यात  २ अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच दुसरीकडे पिंपरी-चिंचवड देखील एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुंड आणि त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पुन्हा बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असून, अत्याचार करणारा सराईत गुंड आणि त्याचे साथीदार गजाआड करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.

अत्याचार करतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

सदर प्रकरणात तर, नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडितेचा लैगिंक अत्याचार करतानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करेन,  नाही तर तुम्हाला जीवे मारेन,  अश्या धमक्या देत आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक लैगिंक अत्याचार केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या घरात आपल्या गॅंगच्या सदस्यासोबत बळजबरीने घुसून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण देखील केली असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.  

तिन्ही आरोपी हे बाल वयात असतानाच त्यांनी खुना सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले

सर्वात धक्कादायक म्हणजे यातील तिन्ही आरोपी हे बाल वयात असतानाच त्यांनी खुना सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. दरम्यान, चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावेळी, चिंचवड पोलिसांनी एका बाल गुन्हेगार आणि दोन १८ वर्षा वरील गुन्हेगाराविरोधात बाल लैगिंक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहे. यातील एका बाल गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतल असून दोन १८ वर्षावरील फरार गुन्हेगारांचा शोध चिंचवड पोलीस करत आहेत. 

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिडीतेच्या आईला त्यांच्या सुरक्षितेविषयी मानसिक आधार दिला

सदर आरोपींची मोठ्या प्रमाणात दहशत असल्याची माहिती आहे. आणि आरोपींच्या याच दहशतीमुळे फिर्यादी पीडित मुलगी आणि तिची आई आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी घाबरत होते. मात्र, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईला त्यांच्या सुरक्षितेविषयी मानसिक आधार दिला आणि तिन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी