Rape Crime : वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून महिलेवर बलात्कार, संगणक अभियंताविरोधात गुन्हा दाखल

पुणे
भरत जाधव
Updated Jan 25, 2022 | 16:44 IST

Computer Engineer Rape : लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर (Matrimonial website) ओळख जमवून लग्नाचं अमिष देऊन महिला अभियंताचा (Female engineer) बलात्कार (Rape) झाल्याची घटना पुण्यातील (Pune) हिंजवडीत (Hinjewadi) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Computer Engineer Rape cass
लग्नाचं अमिष देत महिला महिला अभियंतेचा बलात्कार  
थोडं पण कामाचं
  • पीडित महिलेने तणावातून बाहेर येताच आणि आरोपीचा संपर्क न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
  • पीडित ३२ वर्षीय महिला आणि आरोपी हे दोघे ही संगणक अभियंता आहेत.
  • पीडित ३२ वर्षीय महिला आणि ३४ वर्षीय आरोपी या दोघांचा दुसरा विवाह होणार होता.

Computer Engineer Rape : पुणे :  लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर (Matrimonial website) ओळख जमवून लग्नाचं अमिष देऊन महिला अभियंताचा (Female engineer) बलात्कार (Rape) झाल्याची घटना पुण्यातील (Pune) हिंजवडीत (Hinjewadi) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीही हा संगणक अभियंता आहे. संगणक अभियंता असलेल्या पीडिता महिलेला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पीडित ३२ वर्षीय महिला आणि आरोपी हे दोघे ही संगणक अभियंता आहेत, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. त्यांची ओळख लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर झाली होती. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यप्रकरणी पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय महिला आणि ३४ वर्षीय आरोपी या दोघांचा दुसरा विवाह होणार होता. लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर त्यांची ओळख झाली होती. आरोपीने लग्न करायचं आहे सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यांच्यात ओळख झाल्यानंतर फोन, चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर त्यांच्यातील भेटीदेखील वाढल्या होत्या.

दरम्यान आरोपीने २१ नोव्हेंबरला पीडित महिलेला आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावले. पार्टी झाल्यानंतर ‘तू एकटी घरी जाऊ नकोस उशीर झाला आहे, उद्या सकाळी जा’ असे सांगून पीडितेला थांबवून घेतलं. दरम्यान, आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला अन् तिथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर काही दिवसांनी पीडितेला आरोपीने विवस्त्र करून विनयभंग केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बलात्कार केल्यानंतर आणि तिचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने महिलेशी दुरावा निर्माण करत संपर्क तोडला. यामुळे आपल्याला लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार झाल्याचं समजल्यानंतर महिला तणावात होती. पीडित महिलेने तणावातून बाहेर येताच आणि आरोपीचा संपर्क न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार ३४ वर्षीय आरोपीविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी