पुण्याच्या ४५० मशिदींवरचे भोंगे उतरवा : मनसे

पुणे
रोहन जुवेकर
Updated May 07, 2022 | 13:06 IST

Remove loudspeakers from Pune's 450 mosques : पुण्याच्या ४५० मशिदींवरचे भोंगे उतरवा अशी मागणी मनसेने लेखी स्वरुपात केली आहे. मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून पुण्यातल्या मशिदींवरचे भोंगे उतरविण्याची मागणी केली आहे.

Remove loudspeakers from Pune's 450 mosques
पुण्याच्या ४५० मशिदींवरचे भोंगे उतरवा : मनसे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुण्याच्या ४५० मशिदींवरचे भोंगे उतरवा : मनसे
  • मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्र लिहिले
  • पत्रातून पुण्यातल्या मशिदींवरचे भोंगे उतरविण्याची मागणी

Remove loudspeakers from Pune's 450 mosques : पुणे : पुण्याच्या ४५० मशिदींवरचे भोंगे उतरवा अशी मागणी मनसेने लेखी स्वरुपात केली आहे. मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून पुण्यातल्या मशिदींवरचे भोंगे उतरविण्याची मागणी केली आहे.

भोंग्यावरून होणारी अजान बंद झाली पाहिजे. भोंग्यांचा वापर टाळून अजान करण्यास हरकत नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेने घेतली आहे. पुण्यातील सर्व मशिदींवरचे भोंगे उतरवा आणि भोंग्यांचा वापर टाळून अजान करा; अशा स्वरुपाची मागणी मनसेने केली आहे. 

किती कालावधीत मशिदींवरचे भोंगे उतरविले जाणार हे पुण्यातील सर्व मशिदींच्या मुल्ला मौलवींनी पोलिसांना लेखी स्वरुपात कळवावे अशीही मागणी मनसेने केली आहे. मुल्ला मौलवी पोलिसांना लेखी स्वरुपात भोंगे कधी उतरविणार हे कळवत असतील तर मनसे त्याचे स्वागत करेल. यामुळे संघर्ष टळेल, तणाव कमी होण्यास मदत होईल; असे मनसेचे म्हणणे आहे.

भोंगे कधी उतरविणार हे लेखी स्वरुपात जाहीर केले नाही तर दररोज अजान भोंग्यावर सुरू होताच हनुमान चालिसा ऐकविली जाईल असे मनसेने जाहीर केले आहे.

याआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवार ४ मे २०२२ रोजी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मशिदींवरील भोंगे उतरविले जाईपर्यंत भोंगा विरोधी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी