Gunratna Sadavarte : बारामती : आठ एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलनाच्या नावाखाली हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करत यांना पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सदावर्ते यांच्या निषेधार्थ आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी आंदोलन केले असून, यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी खळबळजनक वक्तव्य करत म्हटलं आहे की, सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
अधिक वाचा ; आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ, पाहा दर
दरम्यान, पुढे बोलताना आंदोलक महिला म्हणाल्या की, पवारांच्या बंगल्यावरील हल्ला हे षडयंत्र आहे. यावेळी, बारामती टेक्स्टाईल पार्कमधील सर्व महिलांनी एकत्र येत काळे झेंडे दाखवत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पवारांच्या बंगल्यावरील हल्ला हे षडयंत्र असल्याचे सांगत महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी एक खळबळजनक वक्तव्य करत म्हटलं आहे की, गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्या व्यक्तीला अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
अधिक वाचा : विठ्ठल दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, २ ठार
सदावर्ते हे समाजात दुहीचे बीज पेरत असून हे करताना ते वकिली व्यवसायाचा कवच म्हणून वापर करत आहेत. यामुळे आता गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करण्यात यावी अशी लेखी तक्रार दिल्याचे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा देखील सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
अधिक वाचा : ..तर आम्ही देखील पाचवेळा मशिदींसमोर आरती म्हणार
तक्रारदार दिलीप पाटील यांनी लवकरात लवकर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे अन्यथा ते पुरावे नष्ट करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच सदावर्तेंनी न्यायमूर्तींच्या विरोधातही अपशब्द वापरल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधी केस लढताना बेकायदेशीर पैसे गोळा केल्याचा आरोप या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.