तरुण संतविचारांकडे कसं पाहतात, याचा अभ्यास महत्त्वाचा, रिंगण वक्तृत्व स्पर्धेप्रसंगी आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचं वक्तव्य

पुणे
रोहन जुवेकर
Updated Dec 24, 2022 | 20:45 IST

Ringan Oratorical competition, Ringan Contest, It is important to study how young people look towards saints : देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी संत विचारांकडे कसं पाहते, याचा अभ्यास व्हायला हवा, असं मत आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केलं.

Ringan Oratorical competition
संत विचारांवर आधारित रिंगण वक्तृत्व स्पर्धा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • संत विचारांवर आधारित रिंगण वक्तृत्व स्पर्धा
  • तरुण संतविचारांकडे कसं पाहतात, याचा अभ्यास महत्त्वाचा
  • रिंगण वक्तृत्व स्पर्धेप्रसंगी आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचं वक्तव्य

Ringan Oratorical competition, Ringan Contest, It is important to study how young people look towards saints : सध्याचं युग हे क्रोधाचं, द्वेषाचं आणि विचारधारांच्या अंताचं आहे. अशा काळात संतांचे विचार खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत. देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी संत विचारांकडे कसं पाहते, याचा अभ्यास व्हायला हवा, असं मत आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केलं. संत विचारांवर आधारित रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन रविवारी (दि. १८) शरदचंद्र कला आणि वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 

पौर्णिमा तोटेवाड (औरंगाबाद), मुग्धा थोरात (पुणे), श्रुती बोरस्ते (नाशिक), सुजित काळंगे (सातारा), गणेश खुटवड (पुणे) यांना अनुक्रमे पहिल्या पाच पुरस्कारानी गौरवण्यात आलं. तर यश पाटील, आकाश सोनवणे आणि शुभांगी ढेमसे यांना उत्तेजनार्थ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ११ हजार, ९ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार आणि उत्तेजनार्थ २ हजार अशी रोख रकमेची पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.

भारत-बांगलादेश दुसरी टेस्ट स्कोअर

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

प्रख्यात पखवाजवादक दासोपंत स्वामी यांच्या वादनाने स्पर्धेचं उद्घाटन झालं. यावेळी एमआयटी युनिवर्सिटीचे संचालक महेश थोरवे आणि प्रा. पांडुरंग कंद उपस्थित होते. तर पुरस्कार वितरण सोहळ्यात कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह हभप पुरुषोत्तम पाटील आणि वार्षिक रिंगणचे संपादक सचिन परब होते. परीक्षक म्हणून अमृता मोरे आणि प्रा. डॉ. राजेंद्र थोरात उपस्थित होते.

‘रिंगण वक्तृत्व स्पर्धे’चं हे दुसरं वर्ष असून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्यानं भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत यंदा महाराष्ट्रभरातून १५ ते २० वयोगटातील ५४ स्पर्धक सहभागी झाले होते. ‘कल्पनेची बाधा न हो कोणे काळी’, ‘कीर्तन : प्रबोधन की मनोरंजन?’, ‘कुणाही जीवाचा न घडो मत्सर’, ‘संत मुक्ताबाई : महान मोटिवेटर’, ‘माझा विठोबा, २८ युगं जुना आधुनिक देव’ या विषयांवर स्पर्धकांनी मांडणी केली.

'वारी अमृताची' या मासिकाची निर्मिती केल्याबद्दल पत्रकार श्रीकांत बोरावके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी