रोहित पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे मनसेवर सोडलं टीकास्त्र , म्हणाले भाजप तुमचा वापर करुन घेतंय हे तुम्हाला कसं कळत नाही

ncp mla rohit pawar on mns parti : राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय मनसेला हे कसं कळत नसेल?खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar criticizes MNS through Facebook post
रोहित पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे मनसेवर सोडलं टीकास्त्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत मनसेवर टीकास्र सोडलं
  • भाजप आपला वापर करून घेतंय मनसेला हे कसं कळत नसेल? - रोहित पवार
  • मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी – रोहित पवार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी २ दिवसांपूर्वी पुण्यात आपल्या अयोध्या दौऱ्याविरोधात सापळा रचला असं वक्तव्य केलं होत. राज ठाकरे यांनी केलेय या विधानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत टीकास्र सोडलं आहे. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय मनसेला हे कसं कळत नसेल? असं रोहित पवार यांनी मम्हटलं आहे.

अधिक वाचा ; या गोष्टींसोबत चुकूनही खाऊ नका दही, शरीराचे होईल मोठे नुकसान

नेमकं काय रोहित पवार यांनी काय म्हटलं आहे?

राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय मनसेला हे कसं कळत नसेल?खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; Netflix वर लवकरच येऊ शकतो 'या' लोकप्रिय सिरीजचा नवा सीझन!

मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी – रोहित पवार

दरम्यान, पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा.... तर पवार साहेब हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल. असं पवार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; Happy Brother's Day 2022 Images : ब्रदर्स डे शुभेच्छा फोटो 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी