रुपाली चाकणकर भडकल्या! हे हे संस्कार नीचपातळीचे म्हणत गुलाबराव पाटील यांना दिला 'हा' इशारा

rupali chakanakar targeted gulabarav patil : एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान करणे हे निषेधार्ह आहे. असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे

rupali chakanakar targeted gulabarav patil
रुपाली चाकणकर भडकल्या! हे संस्कार नीचपातळीचे - चाकणकर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान हे निषेधार्ह – रुपाली चाकणकर
  • आपल्या मतदारंघातील रस्त्याची तुलना त्यांनी एका महिला खासदाराच्या गालासोबत केली
  • गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे

पुणे :  जळगावचे शिवसेनेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) हे आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे सतत चर्चेत असतात. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये सोबत असलेल्या राष्ट्रवादीने देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून असं विधान करणे हे निषेधार्ह आहे, त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं, असा इशाराचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी दिला आहे.

जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान हे निषेधार्ह – रुपाली चाकणकर

आपल्या मतदारंघातील रस्त्याची तुलना त्यांनी एका महिला खासदाराच्या गालासोबत केली, या विधानाबाबत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. त्याचबरोबर, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान करणे हे निषेधार्ह आहे. असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसंच, एका वस्तूची तुलना महिलेच्या रंग रुपासोबत करणे, ही संस्कार आणि संस्कृती अत्यंत नीचपातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देतात, हे चुकीचं आहे. असं देखील चाकणकर यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांनी 'आपल्या मतदारसंघातील रस्ते हे हेमामालनीच्या गालासारखे आहे' असं विधान करून वाद ओढावून घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

मंत्री गुलाबराव पाटील  यांनी बोदवड नगरपंचायत (Bodvad Nagar Panchayat) निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं त्यांनी म्हटलं होत. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे (Hema Malini) रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुणाळीत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. 

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे

दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना देखील आव्हान दिले आहे. त्यांनी आपल्या भाषणात "माझं चॅलेंज आहे 30 वर्षे आमदार राहिलेल्याला.. या माझ्या धरणगावला, जर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईल. अरे महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता करा." असं देखील म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी