Rupali Chakankar । नाना पटोलेंच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी रुपाली चाकणकर म्हणाल्या......

पुणे
Updated Jul 22, 2022 | 14:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

rupali chakankar on nana patole cherrapunji viral video : पत्रकारांनी राज्य महिला आयोग्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नाना पटोले यांचा कथित व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना चाकणकर यांनी, राज्य महिला आयोगाकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. जेव्हा पिडीत महिला आयोगाकडे तक्रार करते तेव्हा आम्ही सदर घटनेची दखल घेतो. - रुपाली चाकणकर

rupali chakankar on nana patole cherrapunji viral videorupali chakankar on nana patole cherrapunji viral video
व्हायरल व्हीडीओ प्रकरणाविषयी रुपाली चाकणकर म्हणाल्या......  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नाना पटोले यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होता असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
  • हा मला बदनाम करण्याचा कट असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे
  • जेव्हा पिडीत महिला आयोगाकडे तक्रार करते तेव्हा आम्ही सदर घटनेची दखल घेतो - चाकणकर

Rupali Chakankar, पुणे : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नाना पटोले यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होता असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान, नाना पटोले यांचा कथित व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा चेरापुंजीमधील असल्याचं बोललं जात आहे. व्हायरल होत असलेल्या या कथित व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सदर व्हिडीओ चेरापुंजी येथे असल्याचा दावा करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कथित व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर करत नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, सदर कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. हा मला बदनाम करण्याचा कट असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होत. मात्र, आता या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना चाकणकर यांनी सदर प्रकरणाबद्दल पहिल्यांदाचं प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा ; अर्जुन कपूर मलायका अरोरापासून दूर,अंशुलानं पेपरवर केली सही

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

पत्रकारांनी राज्य महिला आयोग्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नाना पटोले यांचा कथित व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना चाकणकर यांनी, राज्य महिला आयोगाकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. जेव्हा पिडीत महिला आयोगाकडे तक्रार करते तेव्हा आम्ही सदर घटनेची दखल घेतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आमच्याकडे आलेली तक्रार, त्यासंबंधित पुरावे यासंदर्भात पोलीस विभागाला सूचना देत असतो त्याचबरोबर, तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करुन संबंधित पोलिसांना कारवाई करा म्हणून सूचना देतो. असंही चाकणकर म्हणाल्या.

अधिक वाचा ; आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात शिकणाऱ्या मुलीने घेतला गळफास 

व्हिडीओत नेमकं काय आहे?

सोशल मिडियावरती एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत खुर्चीवर महिलेच्या खांद्यावर हात ठेऊन एक व्यक्ती बसला आहे. या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. आणि त्या महिलेचाही चेहरा दिसत नाही. मात्र पुढच्या फ्रेममध्ये त्या व्यक्तीने जे टीशर्ट घातलं आहे त्याच पद्धतीच्या आणि रंगाच्या टीशर्टमध्ये नाना पटोले अगदी पाश्चिमात्य पेरहावामध्ये दिसत आहेत. त्यामुळे हा कथित व्हिडीओ नाना पटोले यांचा असल्याचा अनेकजण तर्क लावत आहेत. दरम्यान, या व्हिडीओच्या सुरुवातीला रोमान्स इन चेरापुंजी, मेघालय असं लिहिण्यात आलं आहे.

अधिक वाचा : आदित्य ठाकरेंच्या यात्रेला मोठी गर्दी, पण पाठ फिरताच...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी