आपणही वळून पहा! आपलेही नेते जामिनावर असल्याचं कळेल: चाकणकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे
अजहर शेख
Updated May 03, 2021 | 15:05 IST

Rupali Chakankar targeted Chandrakant Patil : कोल्हापूरमध्ये पूर परस्थिती असताना आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे  तुम्हाला तुमचा मतदार संघ सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला

Rupali Chakankar targeted Chandrakant Patil
आपले अनेक नेते जामिनावर- चाकणकरांचा चंद्रकांत पाटलांना टोला   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • थोडसं मागे वळून पाहिलं तर आपलल्या लक्षात येईल आपले अनेक नेते जामिनावर आहेत – चाकणकर
  • जलयुक्तशिवार घोटाळा, चिक्की घोटाळा, मुंबई बँक घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी
  • जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत - चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या मग्रुरीमध्ये आपण बोलत आहात, आणि ज्या पद्धतीने आपण छगन भुजबळ (chagan bhujbal) यांना सांगत आहात की, आपण जामिनावर आहात. पण  थोडंस वळून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपले अनेक नेतेदेखील जामिनावर आहेत, असा निशाणा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर साधला आहे.

नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटरवरती एक व्हिडीओ शेअर करत करत म्हटलं आहे की, भाजपचे प्रदेशाध्यक्षांची सध्या देशात आणि महाराष्ट्रात अतिशय वाईट अशी परिस्थिती उद्भवली आहे. आपल्याला याच काही देण घेण नाही. त्यामुळे “सातत्याने आपण याला महागात पडेल त्याला महागात पडेल, याला बघून घेऊ, याच्यावरती गुन्हा दाखल करा, याला आत टाका यांच्यावरती आपण पीएचडी करता करता एमफील पण करायला लागला आहात”. पण तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत देखील निवडून आणता आली नाही. कोल्हापूरचा महापौर तुमच्या विचाराचा तुम्हाला बसवता आला नाही. कोल्हापूरमध्ये पूर परस्थिती असताना आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे  तुम्हाला तुमचा मतदार संघ सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित असा कोथरुड  मतदारसंघ निवडावा लागला. त्यामुळे याचादेखील आपण शांतपणाने विचार करावा असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. 

थोडसं मागे वळून पाहिलं तर आपलल्या लक्षात येईल आपले अनेक नेते जामिनावर आहेत – चाकणकर

दरम्यान पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, जलयुक्तशिवार घोटाळा असेल, चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा त्याचबरोबर अनेक घोटाळे आहेत. त्याची चैकशी आणखी बाकी आहे. परंतु महाविकास आघाडी समोर कोरोनाची लढाई लढणे फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आम्हाला महत्त्वाचा वाटतो असं चाकणकर म्हणाल्या. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

दरम्यान, भुजबळ यांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. यावर  बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांनाच इशारा दिला. जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचे असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असं चंद्रकांत पाटलांनी भुजबळांना म्हटलं होतं. .

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी