बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले, चाकणकरांनी साधला नवनीत राणा, रवी राणांवर निशाना

rupali chakankar targeted navaneet rana and ravi rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता. त्याचबरोबर नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंड देखील ठोठावला होता

rupali chakankar targeted navaneet rana and ravi rana
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विधानसभेत गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न अपक्ष आमदार रवी राणा यानी केला
  • अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले होते.
  • हे तर बंटी-बबली निघाले असं चाकणकर यांनी ट्वीट केलं आहे

मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर ट्वीट करत जोरदार निशाणा साधला आहे. बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले असं चाकणकर यांनी ट्वीट केलं आहे. दरम्यान, विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन अनेकविध मुद्द्यांवरून चांगलेच गाजले होते. विधानसभेत गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न अपक्ष आमदार रवी राणा यानी केला होता. यावर तालिका अध्यक्षांनी कारवाई करत रवी राणा सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले होते.

अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले होते.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता. त्याचबरोबर नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. यावरूनच प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीटर निशाना साधत बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले असं म्हणत निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी