'कोरोना' हा ** लोकांना होणारा रोग - संभाजी भिडे

पुणे
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2021 | 20:42 IST

'कोरोना' हा ** लोकांना होणारा रोग आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जे याची भीती बाळगतात त्यांनाच हा आजार होतो. इतरांसाठी कोरोना हा रोग नाही; अशा स्वरुपाचे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले.

Sambhaji Bhide Statement Create New Controversy
'कोरोना' हा ** लोकांना होणारा रोग - संभाजी भिडे 

थोडं पण कामाचं

  • 'कोरोना' हा ** लोकांना होणारा रोग - संभाजी भिडे
  • जगण्याच्या लायकीचे नसलेले कोरोनाने मरतात - संभाजी भिडे
  • सामान्यांमध्ये सरकारविषयी असंतोषाची भावना

सांगली: 'कोरोना' हा ** लोकांना होणारा रोग आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. जे याची भीती बाळगतात त्यांनाच हा आजार होतो. इतरांसाठी कोरोना हा रोग नाही; अशा स्वरुपाचे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. जगण्याच्या लायकीचे नसलेले कोरोनाने मरतात असेही संभाजी भिडे म्हणाले. संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी विचारांच्या संस्थेचे संस्थापक प्रमुख आहेत. समर्थकांमध्ये संभाजी भिडे हे भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. 

भाजपचे अनेक नेते आणि संघ परिवाराचे सदस्य यांच्याशी संभाजी भिडे यांचे सलोख्याचे संबंध आहेत. याच कारणामुळे संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याला प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जात आहे. 

कोरोना हा गंभीर आहे म्हणणारे दारू विक्रीला विरोध करत नाही पण कोरोनाचे कारण पुढे करुन इतर अनेक दुकानं बंद करत आहेत. यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. नागरिकांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळवणे कठीण झाले आहे. लहान-मोठ्या व्यवसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे; असेही संभाजी भिडे म्हणाले.

राज्यातले सरकार कोरोना हा विषय हाताळण्याच्या बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप संभाजी भिडे यांनी केला. सामान्यांमध्ये सरकारविषयी असंतोषाची भावना असल्याचे संभाजी भिडे म्हणाले. राज्य शासनाकडून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

याआधीही संभाजी भिडे यांच्यावर आरोप झाले आहेत. प्रामुख्याने भिडे यांचे वैचारिक विरोधक त्यांच्यावर अनेकदा गंभीर स्वरुपाचे आरोप करतात. मात्र आरोप झाले तरी संभाजी भिडे त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर ठाम आहेत. भिडे गुरुजींच्या ताज्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मात्र भिडे गुरुजींनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यात एका समारंभात संभाजी भिडे उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी शिवसेना खासदार अनिल बाबर यांना मास्क काढण्यास सांगितले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी