Pandharpur Wari 2022 Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर

पुणे
रोहन जुवेकर
Updated Apr 13, 2022 | 17:42 IST

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022 : या वर्षी २१ जून २०२२ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022
आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Pandharpur Wari 2022 Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीसाठी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर
 • जाणून घ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
 • मंगळवार २१ जून २०२२ रोजी आळंदी येथून प्रस्थान

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022 : कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून परंपरागत आषाढी वारी होत नव्हती. अखेर यंदा परंपरागत आषाढी वारी होणार आहे. या वर्षी २१ जून २०२२ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

गुरूग्राममध्ये ज्यूस पिऊन २५ जण आजारी; प्रसादाच्या नावाखाली पाजले अमली पदार्थ

शिक्षिकेवर हिंदू देवतांचा अवमान आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार केल्याचा आरोप

आंबेडकर जयंती विशेष २०२२

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

 1. मंगळवार २१ जून २०२२ रोजी आळंदी येथून प्रस्थान
 2. बुधवार २२ जून आणि गुरुवार २३ जून रोजी पुणे
 3. शुक्रवार २४ जून आणि शनिवार २५ जून रोजी सासवड
 4. रविवार २६ जून रोजी जेजुरी, सोमवार २७ जून रोजी वाल्हे
 5. मंगळवार २८ जून आणि बुधवार २९ जून रोजी लोणंद
 6. गुरुवार ३० जून रोजी तरडगाव, शुक्रवार १ जुलै आणि शनिवार २ जुलै रोजी फलटण
 7. रविवार ३ जुलै रोजी बरड, सोमवार ४ जुलै रोजी नातेपुते, मंगळवार ५ जुलै रोजी माळशिरस
 8. बुधवार ६ जुलै रोजी वेळापूर, गुरुवार ७ जुलै रोजी भंडीशेगाव
 9. शुक्रवार ८ जुलै रोजी वाखरी
 10. शनिवार ९ जुलै २०२२ रोजी श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी पालखी सोहळा पोहोचणार
 11. रविवार १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार
 12. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब , बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण
 13. पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण
 14. पालखी सोहळ्यासोबत वारीत सहभागी होणार असलेल्या वाहनांना पोलिसांकडून परवाने (पास) दिले जाणार. फक्त परवानाधारक वाहनांनाच पालखी सोहळ्यासोबत वारीत सहभागी होता येणार.
 15. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे २७ आणि रथामागे २५१ नोंदणीकृत दिंड्या असणार. नोंदणी नसलेल्या आणखी १२५ ते १५० दिंड्याही पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता. पोलीस परवानगी आणि पालखी सोहळा संस्थानशी समन्वय साधून या दिंड्या सहभागी होणार. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी