Satara Murder : सातार्‍यात अज्ञात व्यक्तीची गोळी घालून हत्या, गुन्हा दाखल

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Jul 02, 2022 | 20:33 IST

सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका अज्ञात व्यक्तीची गोळी घालून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

gun fire
सातारा खून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • भरदिवसा एका अज्ञात व्यक्तीची गोळी घालून खून करण्यात आला आहे.
  • या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara Murder : सातारा : सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका अज्ञात व्यक्तीची गोळी घालून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.  (satara unknow person murdered by bullet fire)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्यातील महामार्गालगत असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट शेजारील नटराज मंदिराच्या दारात अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करून त्याला ठार करण्यात आले आहे. या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्यासह तगडा पोलीस बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला असून सातारा शहर पोलीस गोळीबार करणाऱ्या अज्ञात आरोपीचा कसून तपास करत आहेत. सदरचा हल्ला हा कोणत्या कारणावरून झाला आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही. सातार पोलिसांनी घटनास्थळावरून फायर केलेले दोन राऊंडच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. तर गोळीबारामध्ये मृत झालेल्या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी