Pune University Exam Updates : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, फर्स्ट सेमिस्टर परीक्षेबाबत पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय 

पुणे
प्रशांत जाधव
Updated Jan 18, 2022 | 19:54 IST

Education news updates in marathi : पुणे विद्यापीठाच्या फर्स्ट सेमिस्टर परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमावर (portion) घेण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता.  मात्र यंदा अशी सूट देण्यात आलेली नाही. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावरच घेण्यात येणार आहे.

Savitribai phule pune university first semester exam for 2021 22 to be on full syllabus Education news updates in marathi
Pune University Exam Updates : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, फर्स्ट सेमिस्टर परीक्षेबाबत पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय  
थोडं पण कामाचं
  • पुणे विद्यापीठाच्या (Pune University) प्रथम सत्र परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावरच
  • पहिल्या सत्राबाबत पुणे विद्यापीठाचा निर्णय
  • ऑनलाइन शिक्षणाच्या (Online Eduction) माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने निर्णय

Pune University Exam Updates ।  पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सत्र ( first semester ) परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाविद्यालये बंद असली, तरी ऑनलाइन शिक्षणाच्या (online Education )  माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने असा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाने  (University)स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीमुळे (Corona) २०२० मध्ये महाविद्यालये बंद (Collages) करून ऑनलाइन शिक्षण (online) सुरू होते. शैक्षणिक प्लानिंग कोलमडल्याने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या सत्र परीक्षा मार्च-एप्रिल २०२१ मध्ये झाल्या होत्या. बराच काळ बंद असलेली कॉलेजेस आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या ( Science and Technology) अभ्यासक्रमांची परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमांवर घेण्याचा निर्णय जाहीर झाला होता. परंतु, यंदा अशी सूट देण्यात आलेली नाही. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावरच घेण्यात येणार आहे. सर्व विद्या शाखांच्या अधिष्ठातांच्या एकमतानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सांगितले आहे.

Also Read : 10th, 12th Class Online: राज्यात दहावी, बारावीबाबत महत्वाची बातमी, वर्षा गायकवाड यांनी दिले हे आदेश

गेल्या वर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यास झालेला उशीर आणि या शिक्षणामध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेता, ७० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता, असे परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले. 

तसेच प्रात्यक्षिक आणि तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम लक्षात घेत, हा निर्णय केवळ विज्ञान व तंत्रज्ञान शाखेपुरता लागू केला होता. परंतु, त्यानंतर अन्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनीही ७० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची मागणी केली होती. यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष वगळता जुलैपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. त्यानंतर काही काळ महाविद्यालयेही सुरू करण्यात आली. अनेक विद्याशाखांचा सुमारे ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Also Read :  Night school : रात्रशाळेला येणार चांगले दिवस; लवकरच राज्यातील रात्रशाळेसाठी नवे धोरण


परीक्षांचे नियोजन करताना सर्व अभ्यासक्रमांची स्थिती लक्षात घेतली आहे. फेब्रुवारी/मार्चमध्ये ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. अद्याप एक ते दीड महिना हातात असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांकडे अवधी आहे. सर्वच विद्याशाखांच्या परीक्षा यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर होतील, असे परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी