School Reopen: स्कूल चले हम! पुणे अन् राज्याच्या उपराजधानीतील शाळांची वाजणार घंटा; काय असणार निर्बंध जाणून घ्या

पुणे
भरत जाधव
Updated Dec 16, 2021 | 08:37 IST

Maharashtra School Reopen Update : पुणे (Pune) शहरातील आणि राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) मधील शाळा आजपासून (Pune Pimpri Chinchwad School Open Updates) सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे.

Pune and Nagpur's School Start from Today
पुणे अन् नागपूर मनपा शाळा आजपासून सुरू; काय असतील निर्बंध?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • नागपूरमधील शाळा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
 • कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron)व्हेरियन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.

Maharashtra School Reopen Update : पुणे (Pune) शहरातील आणि राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) मधील शाळा आजपासून (Pune Pimpri Chinchwad School Open Updates) सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा (School) प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे. 

नागपूरमधील शाळा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता गुरुवारी 16 डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता. 15) आदेश जारी केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या बाळगून शाळा सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी तशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील शाळाही सुरु होणार

पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आजपासून सुरू होणार आहेत. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तसे परिपत्रक काढलेले आहे. कोरोनाच्या ओमयक्रोन व्हेरियंन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्याच्या सूचना ही शाळेला देण्यात आल्या आहेत.

काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना? 

 • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे.
 • शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे.
 • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.
 • शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
 • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये.
 • शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
 • ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी.
 • मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे.
 • क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.
 • शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा. 
 • शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. 
 • शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये.
 • यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
 • एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे. विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी.
 • शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना  टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे.
 • शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात.
 • या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत.  त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी.
 • पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल

काय आहेत नागपूर मनपा शाळेतील निर्बंध

अडीच लाख विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या मनपाच्या 116 शाळांसह 1053 खासगी शाळा अशा एकूण 1069 शाळा गुरूवारी (ता. 16) सुरू होतील. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या 1069 प्राथमिक शाळांमध्ये एकूण 2 लाख 49 हजार 715 विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मनपाच्या शाळेमध्ये 9319 विद्यार्थी तर अन्य खासगी शाळांमध्ये 2 लाख 40 हजार 396 एवढी विद्यार्थी संख्या आहे. 

दोन विद्यार्थ्यांमध्ये असावे सहा फुटांचे अंतर

नागपूर शहरातील शाळा सुरू करताना शाळेमध्ये वर्गात किंवा अन्य परिसरात दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, प्रत्येकाने फेस मास्क/फेस कव्हर वापरणे बंधनकारक, वारंवार हात धुणे आवश्यक करण्यात आले आहे. दोन बाकांमध्ये 6 फुट अंतर असावे, एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत, अशी व्यवस्था करण्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहेत. 

शाळा उघड्यापूर्वी करा नियोजन

शाळा उघडण्यापूर्वी शाळा प्रशासनाद्वारे आवश्यक नियोजन करण्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या शाळा अजूनही कन्टेन्मेट झोनमध्ये आहे त्या उघडू नये. तसेच जे विद्यार्थी, शिक्षक कन्टेन्मेट झोन क्षेत्रात राहतात त्यांना शाळेत येण्याची अनुमती देऊ नये. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी कन्टेन्मेट झोन क्षेत्रात भेट देऊ नये. अशा सूचना शाळेमार्फत देण्यात याव्यात. पूर्ण शाळेची संपूर्ण स्वच्छता करून घेण्यात यावी. ज्या पृष्ठभागांना वारंवार स्पर्श होतो असे पृष्ठभाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने पुसून घ्यावेत. ज्या शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आलेल्या आहेत. त्यांची स्वच्छता विशेष लक्षपूर्वक करण्यात यावी. 

सामूहिक प्रार्थना टाळा

शाळेत गर्दी होणारे उपक्रम, खेळ, सामूहिक प्रार्थना टाळावेत. शाळेतील जिमनॅशिय वापरताना देखील कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. जलतरण तलाव वापरू नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी