Pune night curfew: पुणे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, नाईट कर्फ्यू लागू

पुणे
सुनिल देसले
Updated Feb 21, 2021 | 16:16 IST

पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Night Curfew
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • पुणे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय 
 • वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय 
 • पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला

पुणे : मुंबईसह राज्यातील विविध भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पुण्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी आणि लोकलप्रतिनिधींसह एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पुण्यात निर्बंध लावण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाईट कर्फ्यू लागू

यानुसार आता सोमवारपासून म्हणजेच २२ फेब्रुवारी २०२१ पासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेर्यंत पुण्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरू राहतील. संचारबंदीत वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.

शाळा, कॉलेजेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, अभ्यासिका निम्म्या क्षमतेने कोविड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन सुरू राहतील. हॉटेल,

लग्न कार्यात २०० जणांच्या उपस्थितीला परवानगी 

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात विवाह सोहळा, लग्न कार्यात गर्दी होऊ नये यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्न कार्यात केवळ २०० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलेली आहे.

महत्वाचे मुद्दे 

 1. जिल्ह्यात लॉकडाऊन नाही मात्र, नियमांची कडक अंमलबजावणी 
 2. २०० व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ, कौटुंबिक आणि राजकीय कार्यक्रम
 3. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा - वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून) 
 4. हॉटस्पॉट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करणार  
 5. मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश
 6. जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू करणार
 7. नमुना तपासण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश
 8. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा
 9. नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा यासोबतच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

पुणे विभागातील कोरोनाची स्थिती (२० फेब्रुवारी २०२१च्या आकडेवारीनुसार)

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

पुणे

२२८

९५८७६

२१४२

पुणे मनपा

४३०

२०३७८२

४५६३

पिंपरी चिंचवड मनपा

१८९

९९५९६

१३२३

सोलापूर

५९

४३७९१

१२१४

सोलापूर मनपा

२०

१३४०७

६२०

सातारा

७२

५७८६७

१८३६

पुणे मंडळ एकूण

९९८

५१४३१९

११६९८

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी