Anil Awachat : ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

पुणे
भरत जाधव
Updated Jan 27, 2022 | 14:18 IST

वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, (Marathi author) सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण (muktangan) या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट (Anil Awachat)  यांचं आज दीर्घ आजाराने (illness) निधन झाले.

Dr. Anil Avchat
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचं निधन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील राहत्या घरी डॉ. अनिल अवचट यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • डॉ. अनिल अवचट यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार
  • अनिल अवचट यांच्या लेखनाची शैली अत्यंत वास्तववादी होती.

Anil Awachat passed away: पुणे : वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक, (Marathi author) सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण (muktangan) या संस्थेचे संस्थापक डॉ. अनिल अवचट (Anil Awachat)  यांचं आज दीर्घ आजाराने (illness) निधन झाले. गुरुवारी सकाळी 9.15 च्या समुमास त्यांनी पुण्यातील (Pune) पत्रकारनगर (Patranagar) येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. 

डॉ. अनिल अवचट यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. अनिल अवचट यांनी मराठी साहित्यामध्ये त्यांची पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचं योगदान दिलं. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली आहे. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसन क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील, असं मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना सांगितले. डॉ. अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर गावातील आहे. मराठी लेखक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून अनिल अवचट यांची ख्याती होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. अनिल अवचट यांनी दलित, मजूर, भटक्या जमाती वेश्यायांच्या प्रश्नांविषयी लेख लिहिले होते.

वास्तववादी शैलीचा लेखक

अनिल अवचट यांच्या लेखनाची शैली अत्यंत वास्तववादी होती. त्यांनी रिपोर्ताज पद्धतीचे लेखन अधिक केले. त्यांच्या या लेखन शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय ठरले. विशेष म्हणजे त्यांची शैली साधी, सरळ आणि अनलंकृत अशी होती. अवचट हे मोठे लेखक होते. पण त्यांचा पिंड कार्यकर्त्यांचा होता. समाजसेवकांचा होता. म्हणूनच त्यांनी तरुण पिढीला सावरण्यासाठी मुक्तांगण संस्थेची उभारणी केली होती.

अल्प परिचय

अवचट यांनी पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली होती. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच बीजेमधील मित्र डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. जब्बार पटेलांसारख्या मित्रांसोबत सामाजिक जागृती, विकास आणि क्रांती या विषयावर त्यांच्या चर्चा चालायच्या. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली. पुढे या तिन्ही मित्रांनी डॉक्टरीपेक्षा सोडून कला, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अवचट यांनी लेखन आणि सामजसेवेला वाहून घेतले होते.

ग्रंथ संपदा

अक्षरांशी गप्पा,  आपले‘से’,  आप्‍त, कार्यमग्न कार्यरत, कुतूहलापोटी, कोंडमारा,  गर्द, छंदांविषयी,  छेद, जिवाभावाचे,  आडवे उभे धागे , धार्मिक : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर] (सहलेखक- विश्राम गुप्ते),  पुण्याची अपूर्वाई, ,प्रश्न आणि प्रश्न, बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन,  Beyond Work- Visionaries From Another India : ‘कार्यरत’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर)  मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह) माझी चित्तरकथा,  माणसं,  मुक्तांगणची गोष्ट पुस्तक : (इंग्रजीत Learning to Live Again) रिपोर्टिंगचे दिवस, Learning to live again, “मुक्तांगण” पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर. 

पुरस्कार

व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य वाङ्:मय पुरस्कार 2017 सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार “सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला आहे. 
डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग 3 वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली आहेत. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार.  डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला 12व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (2015) प्रदान करण्यात आला. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी