पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या , राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

senior police inspector commits suicide : पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली. राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपविले. याआधी पुण्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या सैन्यातील महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 

senior police inspector commits suicide
पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला होता
  • नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही
  • मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे

पुणे पुण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली. राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपविले. याआधी पुण्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या सैन्यातील महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे

शिल्पा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं (senior Police inspector Shilpa Chavhan suicide) नाव आहे. शिल्पा चव्हाण या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात ओढणीनं गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच पोलीस प्रशासनाला धक्का बसला आहे. शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी केलेल्या आत्महत्येची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही

पोलिसांनी घटनास्थळाची कसून झडती घेतली, असून आत्महत्येच्या मुख्य कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शिल्पा चव्हाण या कर्तबगार पोलीस अधिकारी असल्याची देखील माहिती खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. मृत शिल्पा यांनी विश्रांतवाडी येथील शांतीनगर भागातील आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अनेक गरजू लोकांना मदतीचा हात दिला होता

शिल्पा चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देखील दिला होता. तसेच ‘ई- पास’ची जबाबदारी देखील त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. अनेक दिवस त्यांनी भरोसा सेलमध्ये देखील काम केलं होतं. शिल्पा चव्हाण या सध्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. चव्हाण यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. तसेच त्यांचा कामाच्या बाबतीत देखील दरारा होता. अशी देखील माहिती पोलीस खात्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी