महत्वाची बातमी : सेट विद्यापीठाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ, या विद्यापीठाचा निर्णय, किती असणार शुल्क?

पुणे
Updated Jun 10, 2021 | 21:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

SET Exam application dates extended by set exam department : ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून २६ ते ३० जून यादरम्यान दिली आहे.

SET Exam application dates extended by set exam department
महत्वाची बातमी : सेट विद्यापीठाचे अर्ज भरण्यास मुदतवाढ  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जून पर्यंत
  • चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी
  • विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक

पुणे: राज्यात कोरोनाची (corona) संख्या आता जरी कमी होत असली तरी मागील काही दिवसापूर्वी कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळे कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना सेट परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत. याचाच विचार करून, ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. (SET Exam) (SET Exam application dates extended by set exam department)

अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जून पर्यंत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या ३७ व्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी

दरम्यान, ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून २६ ते ३० जून यादरम्यान दिली आहे. १८ जून ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. याबाबची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी ही माहिती दिली आहे.

या शहरांमध्ये होणार आहेत परीक्षा

सदर परीक्षा मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, नाशिक, धुळे, जळगाव, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येणार आहेत. सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली (३७ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, २६ सप्टेंबर, २९२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे.

कोणाला किती आहे परीक्षा शुल्क?

१. खुला रु. ८०० रुपये (प्रक्रिया शुल्कासह)

२. इतर मागासवर्गीय/ भटक्या व विमुक्त जाती जमाती ६५० रुपये - (प्रक्रिया शुल्कासह) विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)*/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PwD) / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / तृतीयपंथी / अनाथ विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडीट / डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बैंकिंगद्वारे भरावी लागणार आहे. 

विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक

जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क केडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी