Sex Racket । लोणावळ्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड,  दिल्ली आणि छत्तीसगडमधील तरूणी पकडल्या

Sex Racket busted in Lonavla । सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपीने आपल्या व्हॉट्सअॅपवर महिलांची छायाचित्रे पाठवून आपल्या संभाव्य ग्राहकांना आमिष दाखवले. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिल्ली आणि छत्तीसगड येथील दोन मुलींची येथून सुटका केली आहे.

sex racket busted in lonavla rescue two women from delhi and chhattisgarh
Sex Racket । लोणावळ्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड 
थोडं पण कामाचं
  • सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपीने आपल्या व्हॉट्सअॅपवर महिलांची छायाचित्रे पाठवून आपल्या संभाव्य ग्राहकांना आमिष दाखवले.
  • पुणे ग्रामीण पोलिसांनी दिल्ली आणि छत्तीसगड येथील दोन मुलींची येथून सुटका केली आहे.
  • कथित सेक्स रॅकेटमधील आरोपी मुंबईच्या चेंबूर भागातील रहिवासी असून पोलिसांच्या मते त्याचे नाव धनंजय राजभर आहे.

Sex Racket busted in Lonavla : पुणे (Pune) पोलिसांनी राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा (Lonavla) येथील कथित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला सेक्स रॅकेटच्या (Sex Racket Busted) संबंधात अटक केली आहे. आरोपी व्हॉट्सअॅपद्वारे संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधत असे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिल्ली (Delhi)आणि छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दोन मुलींची सुटका केली आहे.

कथित सेक्स रॅकेटमधील आरोपी मुंबईच्या चेंबूर भागातील रहिवासी असून पोलिसांच्या मते त्याचे नाव धनंजय राजभर आहे. खरं तर, पोलिसांना लोणावळा हिल स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या या कथित सेक्स रॅकेटची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांचे एक पथक सक्रिय झाले आणि या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली.

आरोपी त्याच्या व्हॉट्सअॅपवर महिलांची छायाचित्रे पाठवून आपल्या संभाव्य ग्राहकांना आकर्षित करत असे. या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केला आणि व्हॉट्सअॅपद्वारे आरोपींशी संपर्क साधला. शुक्रवारी रात्री सुरू झालेली पोलिसांची ही कारवाई शनिवारी सकाळी संपली.

आरोपीने पोलिसांच्या बनावट ग्राहकाला सांगितले की, तो आपल्या निवडलेल्या मुलीला लोणावळ्यातील वर्सोलीला घेऊन येईल. यानंतर पोलिसांनी त्यांचा सापळा रचला आणि आरोपींची वाट पाहण्यास सुरुवात केली. आरोपी एका एसयूव्हीवर स्वार होऊन येथे पोहोचले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी राजभर आणि दोन मुलींना ताब्यात घेतले.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण मोरे यांनी सांगितले की त्यांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे आणि दोन मुलींची सुटका केली आहे. आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई लोणावाना ग्रामीण पोलीस आणि पुणे एटीएस यांनी संयुक्तपणे केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी