Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गाने माणसं जमा करण्यात यश, शरद पवार यांच्याकडून कौतुकाची थाप

पुणे
तुषार ओव्हाळ
Updated Jun 11, 2022 | 11:55 IST

राज्यसभा निवडणुकीस भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले असून शिवसेने संजय पवार पराभूत झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गाने माणसं जमा करण्यात यश आले आहे अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक केले आहे. तसेच राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरे यांनी ती घेतली असेही पवार म्हणाले. 

थोडं पण कामाचं
  • राज्यसभा निवडणुकीस भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले असून शिवसेने संजय पवार पराभूत झाले आहेत.
  • देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गाने माणसं जमा करण्यात यश आले आहे अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
  • तसेच राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरे यांनी ती घेतली असेही पवार म्हणाले. 

Sharad Pawar : पुणे : राज्यसभा निवडणुकीस भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले असून शिवसेने संजय पवार पराभूत झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गाने माणसं जमा करण्यात यश आले आहे अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीस यांचे कौतुक केले आहे. तसेच राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरे यांनी ती घेतली असेही पवार म्हणाले. 

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष मग तो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल त्यांच्या एकही मताला धक्का बसलेला नाही. राष्ट्रवादीला मिळलेले एक्स्ट्रा मत हे शिवसेनेला जाणारे नव्हते. हे मत आमच्या विरोधी पक्षाच्या कोट्यातले होते. हे मत भाजपचे नव्हते तर एका अपक्ष लोकप्रतिनिधीचे होते. हे मत त्यांनी मला सांगून दिले. ज्यांनी मला मत देण्याचे कबुल केले होते त्यांनी आणि मी यापूर्वी अनेकदा एकत्र काम केले आहे आणि मी जर शब्द टाकला तर ते नाही म्हणणार नव्हते. हे मत भाजपचे नव्हते परंतु एक अपक्ष लोकप्रतिनिधी भाजपच्या बाजूने होता त्यांनी आम्हाला मत दिले असेही पवार म्हणाले. राज्यसभते चमत्कार झाला आहे आहे आपण मान्य केले पाहिजे असे पवार म्हणाले. तसेच फडणवीस यांना विविध मार्गाने माणसं जमा करण्यात यश आले आहे असे म्हणून पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.न राज्यसभा निर्मितीची नियम असा आहे की मतदारांनी पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचं असतं. पक्षनेतृत्वाला मत दाखवण्यात काहीही बेकायदेशीर नाही. राजकारणात हा धोका पत्करावाचा लागतो, उद्धव ठाकरे यांनी हा धोका पत्करला, आणि फार कमी फरकाने ही जागा गमावली असेही पवार म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी