सचिन वाझेंना अटक, शरद पवार म्हणाले..

पुणे
अजहर शेख
Updated Mar 14, 2021 | 13:46 IST

Sachin Waze arrest by NIA :मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि सचिन वाझे यांच्या अटकेविषयी शरद पवार यांना विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना शरद पवार यांनी यावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला असल्याचे पाहायला मिळाले

 Sachin Waze arrest by NIA
सचिन वाझेना अटक, शरद पवार म्हणाले  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शरद पवार यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.
  • महाराष्ट्रातील राज्यपालांबद्दल केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे
  • देशाचं राजकारण बदलेलं – शरद पवारांचे भाकीत

बारामती : पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील सचिन वाझे यांच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, हे प्रकरण स्थानिक आहे. असं वक्तव्य शरद पवार यांनी केले.

शरद पवारांचा स्पष्टपणे बोलण्यास नकार

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडीवर भाजपने चांगलाच हल्लाबोल केला होता. रविवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि सचिन वाझे यांच्या अटकेविषयी शरद पवार यांना विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

पत्रकार परिषदेत नेमकं काय शरद पवार म्हणाले?

पवार यांनी देशातील पाच राज्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य केले. पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचं देखील पवार यांनी म्हंटल आहे. तामिळनाडू आणि तिथली आजची परिस्थिती आणि लोकांचा कल स्टॅलिन यांच्याबाजूने आहे. त्यामुळे तेच सूत्रे हाती घेतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तर एक भगिनी राज्यात संघर्ष करत आहे तिला त्रास देण्याचं काम सुरू आहे. बंगाली संस्कृती आणि बंगाली लोकांवर आघात करण्याचा प्रयत्न केला तर सर्व राज्य एकत्र येते. कोणी काही म्हटलं तरी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाततच सरकार बनेल याबाबत माझ्या मनात शंका नाही, असा दावाही शरद पवार यांनी केला. दरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी संपूर्ण पत्रकारपरिषदेत केवळ राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर बोलणे पसंत केले.

महाराष्ट्रातील राज्यपालांबद्दल केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे

दरम्यान, पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी यांनी मुख्यमंत्री असताना अनेकदा राज्यपालांच्या तक्रारी केल्या होत्या. पण आता मोदींच्या राज्यात महाराष्ट्रातील राज्यपालांबद्दल केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. राज्यपालांची जबाबदारी असते घटनेनं राज्य सरकार आणि मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत. त्यानुसार राज्यपालांचं काम असतं शिफारस झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे. पण शिफारस न पाळण्याचा महाराष्ट्रात चमत्कार पाहायला मिळत आहे.

देशाचं राजकारण बदलेलं – शरद पवारांचे भाकीत

आसाम राज्यात भारतीय जनता पार्टीची स्थिती तुलनात्मक दृष्टया चांगली आहे. म्हणजेचं एका ठिकाणी भाजपची सत्ता येईल. इतर राज्यात भाजपचा पराभव होणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हा ट्रेंड आहे. त्यामुळे देशाचं राजकारण बदलेलं, असं भाकीत शरद पवार यांनी वर्तविले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी