शरद पवारांनी लगावला राज ठाकरेंना जोरदार टोला 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. केजरीवालांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड देत दिल्लीकरांची मनं जिंकली आहे. शरद पवार यांनी दिल्लीच्या निकालावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

sharad pawar raj thackeray delhi election result 2020 political news in marathi tpol 1
शरद पवारांनी लगावला राज ठाकरेंना जोरदार टोला   |  फोटो सौजन्य: Times Now

पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. केजरीवालांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड देत दिल्लीकरांची मनं जिंकली आहे. शरद पवार यांनी दिल्लीच्या निकालावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. 

राज ठाकरे यांनी आता त्यांचा अजेंडा आणि झेंडा बदलला आहे, तो बदलताच आणि हिंदुत्वाची झाल पांघरताच राज ठाकरेंच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

काही लोकं भाषणे ऐकण्यासाठी तर काही लोकं फक्त भाषण बघायला येतात. भाषणांना गर्दी झाली म्हणजे मतं मिळतात असं नाही. त्यामुळे राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही, असं पवार म्हणाले.

दरम्यान, भाजप ही देशावर आलेली आपत्ती आहे. या आपत्तीला थांबवण्यासाठी आता प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी, लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चांगले गुळपीठ जमले होते. त्यांनी सोलापूर येथील सभेवेळी एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती. राज ठाकरे  यांनी लोकसभेत एकही जागा न लढवता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. 

त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे जागा लढविल्या होत्या पण त्यातही अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आपले उमेदवार दिले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेचे सूत जुळल्याचे चित्र होते. पण निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेशी हात मिळवून नवीन समिकरण निर्माण झाल्यानंतर आता मनसे राष्ट्रवादीपासून दूर गेल्याचे चित्र दिसत होते. आता शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करून ते आणखी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...