Sharad Pawar: सीरममध्ये कोरोनाची लस घेतली का? शरद पवारांनी दिलं 'हे' उत्तर

Sharad Pawar on Corona Vaccine: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावरील लस घेतल्याची चर्चा होत असताना आता स्वत: शरद पवारांनी या संपूर्ण चर्चेवर भाष्य केलं आहे. पाहा पवारांनी काय म्हटलं.

Sharad Pawar
शरद पवार (फाईल फोटो) फोटो सौजन्य: @PawarSpeaks  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शरद पवारांनी कोरोनावरील लस घेतल्याची जोरदार चर्चा 
  • या चर्चेवर स्वत: शरद पवारांनी भाष्य करत दिलं स्पष्टीकरण 
  • कोरोनावरील लसीची माहिती घेण्यासाठी सीरममध्ये जातो - शरद पवार 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटला (Serum Institute) शुक्रवारी भेट दिली. यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण सीरममध्ये जाऊन आज लस घेतल्याचं सांगितलं. मात्र, ही लस कोरोनावरील लस (Corona Vaccine) नसून प्रतिकारशक्ती वाढवणारं इंजेक्शन (Immunity booster) असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. 

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी आज (२ ऑक्टोबर २०२०) रोजी सीरम इंस्टिट्यूटला भेट देऊन कोरोनावरील लस तयारीच्या कामाची माहिती घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, "त्यांनी मला असं सांगितलं की, कोरोनावरील लस तयार करण्यासाठी साधारणत: जानेवारीचा शेवट उजाडेल. आता त्यांच्याकडे माणसाच्या शरिरातील प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लस आहे. त्याचं इंजेक्शन मी आता घेऊन आलो आहे. या सर्व गोष्टींना तोंड देण्याची क्षमता शरिरात व्हावी यासाठी एक इंजेक्शन आहे."

माझ्यासोबत स्टाफनेही घेतलं इंजेक्शन

आपण घेतलेलं इंजेक्शन हे प्रतिकारशक्ती वाढवणारं इंजेक्शन आहे. माझ्यासोबतच माझ्या स्टाफने सुद्धा हे प्रतिकारशक्ती वाढवणारं इंजेक्शन घेतलं असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.

शरद पवारांनी कोरोनावरील लस घेतली आणि त्यासाठीच ते वारंवार पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटला भेट देतात अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. पण शरद पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत चर्चाांना पूर्णविराम दिला आहे.

तसेच सीरमचे सीईओ पूनावाला हे त्यांचे मित्र आहेत आणि कोरोनावरील लसीचे काम कुठपर्यंत आले या संदर्भातील सर्व माहिती घेण्यासाठी शरद पवार हे सीरमला वारंवार भेट देत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी