Tanaji Sawant : पुणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत अनेक आमदारांना आपल्या सोबत घेऊन गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे शिवसेनेचे आमदार गेले आहेत त्याच्या कार्यालयाची तोडफोड आता शिवसेनेने सुरु केली आहे. भूम – परंडा –वाशीचे आमदार तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयाची तोडफोड देखील शिवसेनेन केली आहे. पुण्यातील बालाजी नगर भागात असणाऱ्या तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवत तोडफोड केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचे मोठे नुकसान देखील झाले आहेत.
अधिक वाचा ; फायनलमध्ये MP मजबूत स्थितीत, पहिला किताब जिंकण्याची संधी
दरम्यान, सावंत यांचे कार्यालय फोडल्यावर शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.
अधिक वाचा ; कॉलेज ड्रॉपआऊट ते कोट्यधीश, गौतम अदानींचा थरारक प्रवास
दरम्यान, पुढे बोलताना शिवसैनिक म्हणाले की, शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवला जाईल असा इशारा काही शिवसेना नेत्यांनी यापूर्वी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यलयाला धडा दिला. असं शिवसैनिक म्हणाले.
अधिक वाचा ; कमजोर शुक्र वाढवू शकतो डायबिटीज आणि डोळ्यांच्या समस्या
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेसोबत गद्दारी करणार असाल तर ती सहन केली जाणार नाही. आता हळूहळू वेळ येत असून, या बंडखोर आमदारांना शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर बंडखोरी करणाऱ्या आमदारांकडून खोटे आरोप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोट्या पद्धतीने जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना पक्षात राहता येणार नाही त्यांना इतर पक्षात जावे लागेल. असही आमदार अंबादास दानवे म्हणाले.