काँग्रेसला शिवसेनेने दिला दे धक्का

कुसगाववासीयांनी एकमताने शिवसेनेच्या श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या सर्वच्यासर्व 9 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

shiv sena win in congress strong hold in kusgaon grampanchayat election
काँग्रेसला शिवसेनेने दिला दे धक्का 

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कुलदीप तात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलचा दणदणीत विजय
  • काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेची मुसंडी, कुसगावमध्ये एकहाती सत्ता
  • पुणे शहरा पासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कुसगावमध्ये गेली 35 ते 40 वर्षे कॉँग्रेसची एकहाती सत्ता होती.

पुणे :  पुणे शहरापासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कुसगावमध्ये गेली 35 ते 40 वर्षे कॉँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र कोंग्रेसने गावात विकासकामे न केल्यामुळे मतदारांनी त्यांना या ग्रामपंचायत निवडणुकीत कात्रजचा घाट दाखवत शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. कुसगाववासीयांनी एकमताने शिवसेनेच्या श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या सर्वच्यासर्व 9 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

या निवडणुकीत श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या ज्ञानेश्वर शंकर मांढरे, सुरेखा दीपक तांबट, रंजना दत्तात्रय गोरे, मयूर हरिभाऊ मांजरे, प्रतिक प्रभाकर गायकवाड, सविता संजय गायकवाड, पुष्पा रामचंद्र मांढरे, छाया शांताराम पांगारे, आनंदीबाई गोरख लांघे यांनी विजय मिळविला आहे.

श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावात येणारा मुख्य रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेजलाईन, आरोग्य व शैक्षणिक सुविधा या गोष्टीच्या विकासाला प्राधान्यक्रम देऊन कुसगावला प्रगतिपथावर नेण्याचे ठरविले आहे.

श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या विजयासाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कुलदीप तात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. निखिल संजय  कोंडे, संतोष शिंदे, दिलीप आबा तांबट, हनुमंत गेनबा मांढरे,(मा.उपसरपंच), संभाजी कोंडे, शंकर दत्तात्रय मांढरे, शोभाबाई शंकर मांढरे, समिंदराबई शंकर मांढरे, संतोष कोंडे, नंदकुमार रामचंद्र भालघरे, विघ्नहर्ता तरुण मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, श्रीनाथ मित्र मंडळ,  छावा ग्रुप, शिवशंभो  मित्र मंडळ  यांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी