Satara Municipal Election । टू व्हिलरवरून आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा खासदार उदयनराजेंवर हल्लाबोल [video]

Udayanraje Bhosale vs Shivendrasinha Bhosale ।  सातारा शहरात टू-व्हीलर चालवत विकास कामाचे उद्घाटन करत फिरणाऱ्यांनी पाच वर्ष फक्त पोस्टरबाजीवरच विकास केला आहे. . त्यांनी टु-व्हीलर जशी व्यवस्थित चालवली तसेच सातारची नगरपालिका देखील पाच वर्ष व्यवस्थित चालवायला हवी होती,

shivendrasinh raje criticized udayanraje Bhosale over two wheeler riding
आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा खासदार उदयनराजेंवर हल्लाबोल  

थोडं पण कामाचं

  •  सातारा शहरात टू-व्हीलर चालवत विकास कामाचे उद्घाटन करत फिरणाऱ्यांनी पाच वर्ष फक्त पोस्टरबाजीवरच विकास केला आहे.
  • टु-व्हीलर जशी व्यवस्थित चालवली तसेच सातारची नगरपालिका देखील पाच वर्ष व्यवस्थित चालवायला हवी होती,
  • आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची खा.उदयनराजेंवर टीका

 Udayanraje Bhosale vs Shivendrasinha Bhosale ।  सातारा शहरात टू-व्हीलर चालवत विकास कामाचे उद्घाटन करत फिरणाऱ्यांनी पाच वर्ष फक्त पोस्टरबाजीवरच विकास केला आहे. त्यांनी टु-व्हीलर जशी व्यवस्थित चालवली तसेच सातारची नगरपालिका देखील पाच वर्ष व्यवस्थित चालवायला हवी होती, आज जी विकास कामे दाखवली जात आहेत ती फक्त नौटंकी आहे, अशी घणाघाती टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinha Bhosale)यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांच्यावर केली आहे

साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे यांच्यातील वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे. शिवाय, अधूनमधून साताऱ्यात या दोघांच्या समर्थकांमध्ये होणाऱ्या वादांच्या घटनांमुळे वेळोवेळी तो प्रकर्षाने दिसून देखील येत असतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर निशाणा साधल्याचे समोर आले आहे. सातारा शहरातील विकासकामांचे उदघाटन , पाहणी आणि भूमिपूजन करण्यासाठी रविवारी खासदार उदयनराजे यांनी शहरातून दुचाकी फेरी केल्यामुळे ते दिवसभर चर्चेत राहिले. कार्यकर्त्याची दुचाकी ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागाची रपेट करत विकासकामांची उद्घाटने आणि पाहणी केली. यावरून आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारपरिषद घेत चांगलीच टीका केली आहे.

शिवेंद्रसिंह राजे म्हणाले, “मी बघत होतो, वाचत होतो की शहरात बरेच नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटनांची भूमिपूजनांची विविध वॉर्डात, संपूर्ण शहरातच पोस्टरबाजी झालेली आहे. सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून वाचायला, ऐकायलाही मिळालं, की काहीजण गाडी घेऊन उद्घाटनाला गेले, काहीजण टू व्हिलर चालवत गेले. त्याचीही चर्चा झाली की ते टू-व्हिलर चालवत गेले. माझं म्हणणं आहे पाच वर्षे नगरपालिका नीट चालवली असती, तर आता एवढी पोस्टरबाजी आणि एवढं सगळं करावं लागलं नसतं. टू-व्हिलर कशी चालवली यापेक्षा आता मला वाटतं सातारकरांनी पाच वर्षे नगरपालिका कशी चालवली? याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे.”

तसेच, जे काही पोस्टर, फ्लेक्स आपण बघतो आहोत. याचा खर्च जर नगरपालिकेच्या तिजोरीतून झाला असेल, तर मला वाटतं की, एवढी पोस्टरबाजी करण्यापेक्षा तेवढ्या खर्चात एखादा रस्ता किंवा एखाद्या वॉर्डातील गटाराचं काम किंवा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणाचं सुशोभिकरण झालं असतं. त्यामुळे जे चाललं आहे ते सगळी नौटकी आहे. आता निवडणुका नगरपालिकेच्या लागणार, जवळ आल्या आहेत. हातात दिलेली संधी निघून गेलेली आहे, हे आता सत्तारूढ आघाडीच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता हे सगळं परत पुढील पाच वर्षे आपल्याला कसं मिळवता येईल? आणि लोकांना, नागरिकांना कसं भुलवता येईल. ही नौटंकी किंवा सगळी शो-बाजी आहे. म्हणून मला वाटतं की नौटंकी करणार जे आहेत. त्यांना सांगावं वाटतं की पब्लिक है सब जानती है.. पब्लिक ही शो बघायला येते. नगरपालिकेला नागरिकांची काही पडलेली नाही. साताराचे नागरिक या नौटंकीवर निवडणुकीनंतर शेवटचा एकदा पडदा टाकतील. अशी परिस्थिती आता साताऱ्यामध्ये निर्माण झालेली आहे. असं शिवेंद्रसिंह राजे यांनी यावेळी सांगितलं.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी