शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक

पुणे
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 23:09 IST

shivshahir babasaheb purandare is critical शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील काही दिवसांपासून पुरंदरेंवर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

shivshahir babasaheb purandare is critical
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक 
थोडं पण कामाचं
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक
  • पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू
  • पुरंदरेंना न्यूमोनियाची लागण झाली

shivshahir babasaheb purandare is critical । पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील काही दिवसांपासून पुरंदरेंवर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. उपचार सुरू असले तरी सध्या पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक आहे.

ओजस्वी वाणीने शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरांत पोहोचविणारे, 'राजा शिवछत्रपती' ग्रंथाचे लेखक, 'जाणता राजा' महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव सांगितला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी