विकृतीचा कळस ! म्हशीच्या रेडकूसोबत अनैसर्गिक कृत्य, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime News: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हशीच्या रेडकूसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • पुण्यात म्हशीच्या रेडकूसोबत अनैसर्गिक कृत्य
  • आरोपीला पकडून ग्रामस्थांनी केली मारहाण
  • मारहाणीत जखमी झालेल्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू

Pune buffalo calf sexually assault: महाराष्ट्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीने म्हशीच्या रेडकूसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपीला हे कृत्य करत असताना ग्रामस्थांनी पाहिले आणि त्यानंतर त्याला पकडून बेदम मारहाण केली. (shocking buffalo calf sexually assault in pune district of maharashtra)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा नेपाळचा रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी म्हशीच्या रेडकूसोबत अनैसर्गिक संभोग करत असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर आरोपीला अटक करण्यात येणार आहे.

हे पण वाचा : संशयामुळे नातेसंबंध बिघडण्यास सुरुवात झाली तर...

म्हशीच्या रेडकूसोबत अनैसर्गिक कृत्य करणारा आरोपी हा 38 वर्षीय आहे. या घटनेची माहिती शनिवारी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना शुक्रवारी घडली आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपी व्यक्तीला म्हशीच्या रेडकूसोबत कथितपणे अनैसर्गिक संभोग करताना पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत आरोपी हा बेशुद्ध पडला.

हे पण वाचा : 12 राशींपैकी सर्वाधिक धोकादायक रास कोणती? वाचा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा नेपाळचा निवासी असल्याचं बोललं जात आहे. स्थानिकांच्या मारहाणीत बेशुद्ध झालेल्या या आरोपीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांनी दिलेले काही पुराव्यांच्या आधारे आरोपी व्यक्तीच्या विरोधात 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी