धक्कादायक, महाराष्ट्रात घडली घटना,  माजी सैनिकाचा कोर्टाबाहेर गोळीबार; पत्नी ठार, सासू गंभीर

पती पत्नीत वाद होतात, त्यानंतर काही जण टोकाचे पाऊल उचलत घटस्फोट घेतात, पण घटस्फोटानंतरही आणखी टोकाचे पाऊल एका माजी सैनिकाने कोर्टाबाहेर उचलले

Shocking incident in Maharashtra, ex-soldier shot out of court; Wife killed, mother-in-law seriously Injured
 माजी सैनिकाचा कोर्टाबाहेर गोळीबार; पत्नी ठार, सासू गंभीर  |  फोटो सौजन्य: BCCL

शिरूर, पुणे :  पती पत्नीत वाद होतात, त्यानंतर काही जण टोकाचे पाऊल उचलत घटस्फोट घेतात, पण घटस्फोटानंतरही आणखी टोकाचे पाऊल एका माजी सैनिकाने कोर्टाबाहेर उचलले. घटस्फोटाचा खटला सुरू असताना कोर्टाच्या परिसरात माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. (Shocking incident in Maharashtra, ex-soldier shot out of court; Wife killed, mother-in-law seriously Injured )

पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे ही घटना घडली आहे. दाम्पत्याच्या घटस्फोटाचा दावा कोर्टात दाखल होता. याच कारणावरून पतीने पत्नी आणि सासूवर परवानाधारक बंदुकीतून गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक पांडुरंग ढवळे (रा. अंबरनाथ, ठाणे) असे गोळीबार केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

त्याने पत्नी मंजुळा आणि तिच्या आईवर कोर्टाच्या परिसरात गोळीबार केला आहे. या दोघेही नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील रहिवासी आहेत.  

त्यांचा पोटगीचा खटला कोर्टात सुरू आहे. आरोपीसोबत त्याचा सख्खा भाऊ संदीप पांडुरंग ढवळे हा होता. ते दोघेही अंबरनाथ येथून रिक्षाने शिरुर येथे आले होते. 

गोळीबार करून हे दोघेही पळून जात होता. रांजणगाव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले आहे. रिक्षा आणि शस्त्र जप्त केली आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी