धक्कादायक, माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण 

सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावातील माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप  आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

Shocking, pregnant forest ranger beaten by former sarpanch
धक्कादायक, माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण  
थोडं पण कामाचं
  • सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावातील माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप  आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
  • ही महिला वन रक्षक तीन महिन्याची गरोदर आहे.
  • तिला माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नीने चप्पलांनी आणि दगडाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Shocking Video । सातारा : सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावातील माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप  आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे ही महिला वन रक्षक तीन महिन्याची गरोदर आहे. तिला माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नीने चप्पलांनी आणि दगडाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

या संदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून या मारकुट्या सरपंचाला आणि त्याच्या पत्नीला अटक केल्याची माहिती दिली आहे. अशा प्रकारचे कृत्य सहन केले जाणार नाही असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मला न सांगता इतर ठिकाणी मजुरांना कसे कामाला लावले या कारणावरून महिला वन रक्षकाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  या व्हिडिओनंतर सातारा पोलीस सतर्क झाले असून मारकुट्या सरपंच आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सरकारी कामात हस्तक्षेप करणे आणि ऑन ड्युटी सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलणे हा गुन्हा माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांच्या पत्नीवर दाखल करण्यात आला आहे. 

 
धक्कादायक, माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण धक्कादायक, माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण #satara #satarapolice Satara राजधानी सातारा Chhatrapati Udayanraje Bhonsle Posted by Times Now Marathi on Wednesday, January 19, 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी