Pune News: विद्येच्या माहेरघरात चाललंय काय? आयोजित केलंय 'सेक्स तंत्र' नावाचं शिबीर, जाहिरात VIRAL

Pune news: पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात चक्क सेक्स तंत्र नावाचं शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. 

shocking Sex tantra named camp organised in Pune during navratri festival
विद्येच्या माहेरघरात चाललंय काय? आयोजित केलंय 'सेक्स तंत्र' नावाचं शिबीर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • नवरात्री दरम्यान पुण्यात सेक्स तंत्र नावाचं शिबीर
  • सेक्स तंत्र नावाच्या शिबिराची जाहिरात व्हायरल 
  • शिबिराच्या जाहिरातीवरुन नवा वाद सुरू

Sex Tantra camp orgainsed in Pune: पुणे शहरात सेक्स तंत्र नावाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भातील जाहिरात सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नवरात्री दरम्यान या प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हायरल होणाऱ्या जाहिरातीमुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. (shocking Sex tantra named camp organised in Pune during navratri festival read in marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला 'सेक्स तंत्र' नाव देण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी तब्बल 15 हजार रुपये इतके शुल्क सुद्धा आकारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा : प्रेग्‍नेंसीमध्ये 'या' गोष्टीचा होतो सर्वात जास्त त्रास

व्हायरल होणाऱ्या जाहिरातीत म्हटलं आहे, सेक्स तंत्र नावाचा कोर्स 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. प्रतिव्यक्ती 15 हजार रुपये भरुन या शिबिरात कोणीही सहभागी होऊ शकतो. या शिबिरात काय शिकवलं जाणार आहे हे सुद्धा या जाहिरात नमूद करण्यात आले आहे. या कोर्स संदर्भात जेव्हा पुणे पोलिसांना माहिती मिळाली त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला की, हे आयोजन नेमकं कोण करत आहे.

हे पण वाचा : लैंगिक क्षमता वाढवणारे पदार्थ, जे देतील तुम्हाला बूस्टर

व्हायरल होणाऱ्या जाहिरातीमध्ये सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशन असे नाव आहे. मात्र, खरंच ही संस्थाच हे शिबीर आयोजित करत आहे का? या जाहिरातीत एक फोन नंबर देण्यात आला आहे मात्र, तो नंबर लागत नाहीये. या नंबरच्या माध्यमातून आणि वेबसाईटच्या माध्यमातून आयोजकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

तसेच ही जाहिरात नेमकी आली कोठून? सोशल मीडियात ही जाहिरात व्हायरल कधी आणि कुठून झाली याबाबतही पोलीस तपास करत आहेत. 

हे पण वाचा : चांगली झोप लागण्यासाठी फॉलो करा खास टिप्स

काय आहे जाहिरातीमध्ये? 

  1. सेक्स तंत्र नावाचा तीन दिवसीय कोर्स
  2. 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान कोर्सचं आयोजन
  3. पुण्यातील कॅम्प भागात कोर्सचं आयोजन करण्यात आले
  4. शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती 15 हजार रुपये शुल्क
  5. जाहिरातीत एक क्यूआर कोड देण्यात आला आहे त्याद्वारे संपर्क करण्यात येत असल्याची माहिती

सेक्स तंत्र शिबिरात कोणते कोर्स आहेत?

वैदिक सेक्स तंत्र

डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एंबोडीमेंट 

चक्र अ‍ॅक्टिव्हेशन

ओशो मेडिटेशन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी